नागपूर : नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका ड्रग्ज पेडलर्ससह (Nagpur Drugs Paddler Arrest) चौघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एमडी ड्रग्जसह साडे तीन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे (Nagpur Drugs Paddler Arrest).
नागपूर ड्रग्ज तस्कराचं केंद्र बनत आहे का? असा प्रश्न आता राज्याच्या उपराजधानीत उपस्थित व्हायला लागला आहे. नागपुरात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या होत असलेल्या कारवाया बघता हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की दोन व्यक्ती एमडी ड्रग्ज विकण्यासाठी येत आहे. त्या माहितीवरुन पोलिसांनी सापळा रचला आणि मोहमद इशतीयक अन्सारी, सोहेल पटेल यांना अटक केली.
त्यांच्याकडून माहिती घेतली असता त्यांनी भिवंडी येथील दानिश अन्सारी आणि मोहमद कफिक मोहमद आयुब यांची नावं सांगितली आणि पोलिसांनी त्यांना सुद्धा अटक केली. यातील दानिश हा भिवंडी येथील ड्रग्ज पेडलर असून तो इतरांना ड्रग्ज पुरवत होता.
या पथकाने नागपुरात या आधी सुद्धा कारवाया करत आरोपींना अटक केली आहे त्यामुळे नागपुरात एमडी ड्रग्जची तस्करी वाढली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. एमडी सारख्या ड्रग्जची होत असलेली तस्करी आणि व्यापाराला आताच ठेचून काढण्याची गरज आहे.
मसाजरमध्ये लपवलेला सिंथेटिक ड्रग्जचा मोठा साठा जप्त https://t.co/WuEXpK2pC5 #drugs #SyntheticDrugs #Bengaluru #Crime #Police
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 13, 2020
Nagpur Drugs Paddler Arrest
संबंधित बातम्या :
ड्रग्ज प्रकरणातील कोरोना पॉझिटीव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन; मुंबई पोलिसांची शोधाशोध
दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार