नागपूर : नागपुरात भाडेकरु पती पत्नीने मिळून घर मालकिणीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पतीने त्या घर मालकीनीसोबत वारंवार बलात्कार केला. तर पत्नीने समलैंगिक संबंध प्रस्थापित केले. याप्रकरणी आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे. (Nagpur Homeowner Lady Molested by tenant Couple)
नागपुरात आतापर्यंत एखाद्या महिलेने पुरुषाने लैंगिक शोषण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र एका महिलेनेही महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागपूरच्या प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पीडित महिला राहते. या महिलेच्या घरी रामकिशन जंगीड आणि त्याची पत्नी भाड्याने राहत होते.
रामकिशन जंगीड यांनी या घरमालकीन महिलेला आपल्या जाळ्यात ओढले. तिच्यावर वारंवार बलात्कार केला. एवढचं नाही तर जंगीड यांच्या पत्नीनेही त्या महिलेसोबत समलैगिंक संबंध प्रस्थापित केले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
काही दिवसांनी या दाम्पत्याने त्या महिलेचे घर सोडलं. ते दुसरीकडे राहायला गेले. मात्र त्या घरमालक असलेल्या महिलेला घरी बोलवून दोघंही पती पत्नीसोबत वारंवार लैगिंक संबंध प्रस्थापित केले. त्यावेळी या पती-पत्नीने त्या महिलेला तू आमच्या कुटुंबातील आहे, असं सांगितलं. एवढंच नाही तर स्टॅम्प पेपरवर तिच्याशी लग्न करतो असही जंगीड याने लिहून दिलं.
गेल्या 9 वर्षांपासून सुरु आहे. मात्र गेल्या काही दिवसात हे दाम्पत्य त्या महिलेला दूर करण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे त्याला कंटाळून तिने पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन जंगीड दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
नागपुरात घडलेली ही घटना अनेकांना अचंबित करणारी आहे. पती पत्नी दोघांनी मिळून महिलेचे लैंगिक शोषण केले. विशेष म्हणजे महिलाही आपल्या पतीला अशा कामात साथ देते. तसेच समलैंगिक संंबंध ठेवते, असा प्रश्न नागपूरकर उपस्थित करत (Nagpur Homeowner Lady Molested by tenant Couple) आहे.
संबंधित बातम्या :