नागपूर : नागपूरसह विदर्भात थंडी वाढणार आहे. सध्या विदर्भात सरासरी 11 ते 15 तापमान आहे. पुढील पाच दिवसांत पाच अंश तापमान घटणार आहे. विदर्भातील तापमान 10 अंशाच्या खाली जाणार असल्याचा अंदाज नागपूर हवामान विभागान व्यक्त केलाय.
नागपूरसह परिसरात गेल्या काही दिवसांत तापमानात घट झालीय. थंडी वाढायला लागलीय. विदर्भात येत्या पाच दिवसांत तापमानात आणखी 3 ते 5 पाच डिग्री अंश सेल्सियसपर्यंत घटणार, असा अंदाज नागपूर हवामान विभागाने वर्तवलाय. नागपूरसह विदर्भात सध्या 11 ते 15 अंश सेल्सिअस सरासरी तापमान आहे. त्यामुळं हुडहुडी भरायला लागलीय. येत्या पाच दिवसांत पारा आणखी घटणार आहे. नागपूरकरांना आणखी गुलाबी थंडी अनुभवायला मिळणार आहे. यासोबतच वाढलेल्या थंडीचा रब्बीतील गहू, चणा आणि भाजीवाला पिकालाही फायदा होणार असल्याचं हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ भावना यांनी सांगितलंय.
उत्तरेकडील हवामानाचा विदर्भावर परिणाम जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून आकाश निरभ्र आहे. त्यामुळं थंडी वाढायला लागली आहे. विदर्भातील काही भागात किमान तापमानापेक्षा एक ते तीन अंशांची घट होणार आहे. दिवसातील तापमानातही घट होईल. गेल्या दोन दिवसांत किमान तापमानात घसरण झाली आहे. बुधवारी सायंकाळी सहापासून थंडीचा जोर वाढायला लागला आहे. शिवाय दिवसाच्या तापमानातही घट झाली आहे.
पुढील आठवड्यात थंडीचं प्रमाण आणखी वाढेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. दोन-तीन अंश डिग्री सेल्सिअस तापमानात घट होईल. पुढील आठवड्यात 10-11 डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी तापमान होईल, असा अंदाज आहे. तर जास्तीत-जास्त तापमान 28 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आले. आकाश निरभ्र राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आतापर्यंत पडते तशी थंडी पडली नव्हती. पण, गेल्या दोन दिवसांत विदर्भातील तापमानात घसरण झाली.