नागपूर : तुकाराम मुंढे असताना लॉकडाऊनला विरोध करणाऱ्या भाजपकडून (Nagpur Mayor Sandip Joshi Asked For Lockdown) आता नागपुरात लॉकडाऊनची मागणी करण्यात येत आहे. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी शहरात कडक लॉकडाऊन करण्याची मागणी केली आहे (Nagpur Mayor Sandip Joshi Asked For Lockdown).
कोरोना नियंत्रणासाठी महापौरांनी पालकमंत्र्यांकडे लॉकडाऊनची मागणी केली आहे. नागपूरातील कोरोना स्थिती नियंत्रणाबाहेर जात आहे. रोज सरासरी 50 च्या आसपास कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे.
कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी शहरात लॉकडाऊनची गरज असल्याने शहरात लॉकडाऊन करण्याची मागणी महापौरांनी केली आहे. महापौरांसह सर्वसामान्य नागरिकांचीनी नागपुरात लॉकडाऊनची मागणी केली आहे.
नागपुरात 71,616 कोरोना रुग्ण
नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाचली आहे. सध्या नागपुरात 71 हजार 616 कोरोना रुग्ण आहेत. यापैकी 53 हजार 418 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, आतापर्यंत 2261 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. नागपुरातील कोरोनाचा मृत्यूदर हा 2.87 टक्के आहे. तर रिकव्हरी रेट 74.59 टक्के आहे. तसेच, कोरोना डबलिंग रेट 29.1 दिवस इतका आहे (Nagpur Mayor Sandip Joshi Asked For Lockdown).
नागपुरात ‘रेमडेसिवीर’चा मोठा तुटवडा
नागपुरात ‘रेमडेसिवीर’चा मोठा तुटवडा उद्भवला आहे. ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट होत आहे. या इंजेक्शनची जास्त दराने विक्री होत असल्याच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत. मेडिकल आणि मयो या सरकारी रुग्णालयांमध्येही ‘रेमडेसिवीर’चा तुटवडा आहे. त्यामुळे नागपुरात कोरोना रुग्णांना ना वेळेवर उपचार मिळत आहेत नाही औषधं अशी स्थिती आहे.
#नागपूर – नागपुरात ‘रेमडेसिवीर’चा मोठा तुटवडा, ‘रेमडेसिवीर’ इंजेक्शनसाठी कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची पायपीट, जास्त दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी, मेडिकल आणि मयो या सरकारी रुग्णालयातंही तुटवडा pic.twitter.com/M7s0DVwRk5
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 25, 2020
Nagpur Mayor Sandip Joshi Asked For Lockdown
संबंधित बातम्या :