नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात महापौर संदीप जोशी आणि महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद थांबण्याची चिन्ह दिसत नाही (Sandip Joshi question Tukaram Mundhe). महापौर संदीप जोशी यांनी आज (3 जुलै) पत्रकार परिषद घेत तुकाराम मुंढे यांच्यावर अनियमिततेचे आरोप केले. तसेच मुंढे स्मार्ट सिटी प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) नसताना त्यांनी कंत्राटदारांना 18 कोटी रुपये कसे दिले, असा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी महापौरांनी आयुक्तांवर पुरावे सादर करत अनियमिततेचे आरोप केले.
महापौर संदीप जोशी यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत पालिका आयुक्त तुकाराम मुंढेंवर अनियमिततेचे आरोप केले. यावेळी त्यांनी निर्णय घेण्यात आला तेव्हा आयुक्तांकडे स्मार्ट सिटी प्रकल्पाचा कार्यभार नसल्याचं सांगितलं. तसेच याबाबतचे पुरावे देखील सादर केले. मुंढे यांनी प्रभार नसताना कंत्राटदारांना पैसे देऊन अनियमितता केल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. यासंदर्भात संदीप जोशी यांनी तुकाराम मुंढे यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रारही दिली आहे. यामुळे महापौर आणि आयुक्त यांच्यातील वाद चांगलाच शिगेला पोहचल्याचं पाहायला मिळत आहे.
कुरबुरीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाठी, मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या भेटीपूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर https://t.co/oJO5SYCUpY @PawarSpeaks @AjitPawarSpeaks @OfficeofUT @rautsanjay61 @dineshdukhande
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 3, 2020
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रमुखाची (सीईओ) निवड करण्यासाठी 10 जुलैला बैठक होत आहे. त्यामुळे जर तुकाराम मुंढे यांची स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या प्रमुख पदावर निवड झाली नव्हती, तर त्यांनी कुठल्या अधिकारानं कंत्राटदाराला 18 कोटी रुपये दिले, असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केलाय. नियम सांगणाऱ्या मुंढे यांनी नियम तोडले. नियमाच्या बाहेर वागले आणि गैरव्यवहार केला, असा आरोपही महापौरांनी केलाय.
सोबतच स्मार्ट सिटीच्या बैठकीला महापौरांना सहभाग आणि मतदान करता येऊ नये यासाठी मुंढे यांनी प्रयत्न केल्याचाही आरोप जोशी यांनी केला. या संदर्भात महापौरांनी कोर्टात धाव घेतली. यानंतर कोर्टानं महापौरांना दिलासा देत बैठकीत सहभागी होण्यास आणि मतदान करण्यास परवानगी देण्याचा निर्णय दिला.
महापौर संदीप जोशी यांनी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावर अनियमिततेचे आरोप केले असले तरी मुंढे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. या आरोपांवर बोलताना तुकाराम मुंढे यांनी स्मार्ट सिटीच्या संचालकांनी आपल्याला फोनवर चार्ज दिल्याचं सांगितलं. तसेच यात कुठंही गैरव्यवहार झाला नसल्याचं स्पष्ट केलं.
हेही वाचा :
रत्नागिरीत कोव्हिड योद्धे कोरोनाच्या कचाट्यात, पोलीस अधीक्षकांनंतर ZP सीईओही पॉझिटिव्ह
Mumbai Rains Live | मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस, समुद्रात उंच लाटा
Sandip Joshi question Tukaram Mundhe