नागपूर मनपा कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, तब्बल 17 हजार 537 कर्मचाऱ्यांची वेतन वाढ

| Updated on: Dec 09, 2020 | 8:06 AM

कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजारांपासून 15 हजार रुपयांपर्यंत वेतन वाढ होणार आहे. (NMC Worker Get 7th Pay Commission) 

नागपूर मनपा कर्मचाऱ्यांना नववर्षाची भेट, तब्बल 17 हजार 537 कर्मचाऱ्यांची वेतन वाढ
Follow us on

नागपूर : नागपूर महानगरपालिका प्रशासनाने कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. नागपूर मनपातील तब्बल 17 हजार 537 कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात 4 हजारांपासून 15 हजार रुपयांपर्यंत वेतन वाढ होणार आहे. (NMC Worker Get 7th Pay Commission)

नुकतंच राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने नागपूर महापालिका आयुक्तांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार नागपूर महापालिकेत काम करणाऱ्या 11 हजार 537 कर्मचाऱ्यांना वाढीव वेतनाचा लाभ मिळणार आहे. तसेच सप्टेंबर 2019 पासून 15 महिन्याचे एरिअर्स मिळणार आहे.

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे मनपा कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. मात्र यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर दर महिन्याला 125 कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना 2016 मध्ये सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला होता. मात्र नगरविकास विभागाने याबाबतचा काहीही निर्णय न घेतल्याने राज्यातील मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला नव्हता. मात्र मंगळवारी (9 डिसेंबर) रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते नागपूर महापालिकेला सातवा वेतन आयोग लागू करण्याचे आदेश जारी करण्यात आले.(NMC Worker Get 7th Pay Commission)

संबंधित बातम्या : 

…म्हणून हॉटेल ताज पॅलेसची 8 कोटी 85 लाखांची थकबाकी पालिकेकडून माफ

नागपूरचे महापौर संदीप जोशी राजीनामा देण्याची शक्यता, राजकीय वर्तुळात खळबळ