नागपूर : कोरोना विषाणू संसर्ग आणि लॉकडाऊनचा परिणाम अनेक उद्योग आणि व्यावसायिकांवर झालेला पाहायला मिळाली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र फटाका विक्री होत असते. नागपूर महापालिका क्षेत्रात फटाका विक्री करणाऱ्या व्यावसायिकांच्या संख्येत यंदा घट झाल्याचे चित्र आहे. नागपूर महापालिकेतर्फे यंदा फक्त 582 फटाका दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. कोव्हिड संदर्भातील नियमांसह अग्निसुरक्षा नियमांचेही पालन करणे अनिवार्य करण्यात आले आहे. फटका विक्रीची परवानगी मागणाऱ्यांची संख्येत 20 ते 30 टक्के घट झाल्याचे चित्र आहे. (Nagpur Municipal Corporation issued five hundred eighty two permissions to crackers sellers )
दिवाळी म्हटलं की फटाके आले मात्र यावर्षी कोरोनामुळे अनेक निर्बंध लागले आहेत. येत्या दिवाळीसाठी संपूर्ण नागपूर शहरात तयारीला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावात संपूर्ण सुरक्षेची काळजी घेउन मनपातर्फे शहरातील व्यावसायिकांना परवानगी देण्यात येत आहे. दिवाळीमध्ये सर्वाधिक मागणी असलेल्या फटाक्यांसंदर्भात विस्फोटक अधिनियमांन्वये नागपूर महानगरपालिकेतर्फे दुकानांना परवानगी देण्यात येते.
यावर्षी मनपाच्या 9 अग्निशमन स्थानकांतर्गत केवळ 582 फटाका दुकानांना अग्निशमन विभागातर्फे नाहरकत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. महत्त्वाचे म्हणजे यावर्षी फटाक्यांचे दुकान लावण्यासाठी 20 ते 30 टक्के अर्ज देखील कमी आले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके उचके यांनी दिली.
मनपातर्फे दरवर्षी फटाका व्यावसायिकांना अस्थायी व्यवसायाचे नाहरकत प्रमाणपत्र दिले जाते. तसेच अंतिम परवानगी/लायसन्स पोलीस विभागातर्फे देण्यात येते. मनपाच्या अग्निशमन विभागाव्दारे रु. 1000 शुल्क आकारण्यात येते तसेच पर्यावरण शुल्क रु. 3000 आकारण्यात येत आहे. मागच्या सहा वर्षात अग्निशमन विभागाने एक हजार पेक्षा जास्त दुकानांना परवानगी दिली जाते. मात्र, यावर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता केवळ 582 दुकानांना अटीशर्थींसह परवानगी देण्यात आली आहे.
मनपाला या माध्यमातून 23 लाख रुपयांचे उत्पन्न होणार आहे. गर्दीच्या व गजबजलेल्या मार्गांवर फटाका दुकाने लावता येणार नाहीत.
संबंधित बातम्या:
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचं हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत होणार? चर्चेअंती निर्णयाची शक्यता
नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी काँग्रेसचा उमेदवार जवळपास निश्चित, भाजपचं मात्र ठरता ठरेना!
(Nagpur Municipal Corporation issued five hundred eighty two permissions to crackers sellers )