नागपूर : नागपुरात तुरुंगातून सुटलेल्या (Nagpur Murder Case) व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. अनुज बघेल असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. तो 16 मे रोजी तुरुंगातून सुटला होता. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी सुरु केली आहे (Nagpur Murder Case).
लॉकडाऊनच्या काळात नागपुरात गुन्हेगारी कमी झाली होती. मात्र, लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता मिळताच गुन्हेगारीने डोकं वर काढलं आहे. नागपुरात काल रात्री तुरुंगातून सुटलेल्या अनुज बघेल या व्यक्तीची हत्या झाली. अनुज बघेलने तुरुंगात जाण्यापूर्वी एका व्यक्तीची गाडी जाळली होती. ही व्यक्ती त्याचा मोबदला मागत होती. मात्र, अनुज बघेल ने तो मोबदला देण्यास नकार दिला (Nagpur Murder Case).
या मुद्यावरुन दोघांमध्ये मोठं भांडण झालं. हे भांडण इतक्या टोकाला गेलं की त्या त्यातून अनुज बघेलची हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयित आरोपींना अटक केलं आहे.
नागपुरात गेल्या काही दिवसात चार ते पाच हत्तेच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागपुरात गुन्हेगारी पुन्हा डोकं वर काढत आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे (Nagpur Murder Case).
गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू https://t.co/hdhhoRKUY3 #Shahapur
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 4, 2020
संबंधित बातम्या :
गावठी कट्ट्यातील गोळी डोक्यात घुसली, वडिलांच्या बर्थडे पार्टीत मुलाचा संशयास्पद मृत्यू
कोल्हापुरात 55 वर्षीय महिलेकडून पोटच्या मुलाची हत्या, खलबत्ता डोक्यात घालून जीव घेतला
दिवसभर फाटके कपडे घालून वेडसरपणे फिरायचं, रात्री चोरी, लॉकडाऊनमध्ये पोलिसांनी मोठा आरोपी पकडला