नागपूर : दीड वर्षांपासून पोलिसांना झुंजार देत वाँटेड असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात (Nagpur Police Arrest Thief) बजाज नगर पोलिसांना यश आलं आहे. श्रीकांत जीवन निखाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने चोरी करुन विकेलेला 20 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे (Nagpur Police Arrest Thief).
हा आरोपी इतका हुशार होता की पोलीस मोबाईल लोकेशनवरुन आपल्यापर्यंत पोहचतील म्हणून त्याने मोबाईल वापरणे बंद केले. तो वेळोवेळी आपल्या कामांचं ठिकाण बदलत असल्याने पोलीस त्याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. मात्र, आरोपीची हुशारी दीड वर्षांपेक्षा जास्त चालू शकली नाही. अखेर पोलिसांनी त्याला नागपूर-भोपाळ मार्गावरील एका धाब्यावर काम करताना अटक केली.
गेल्या वर्षी आरोपी श्रीकांत निखाडेने बाजाज नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत योगेश शेंडे यांच्या घरी चोरी केली होती. चोरट्याने 455 ग्राम सोन्याचे दागिने चोरुन नेले होते. पोलिसांनी या प्रकरणात अमोल राऊत नावाच्या आरोपीला अटक केली होती. मात्र, चोरीचा संपूर्ण मुद्देमाल हा श्रीकांत जीवनेकडे सोपाल्याची माहिती आरोपीने दिल्यानंतर पोलिसांनी श्रीकांतचा शोध सुरु केला होता (Nagpur Police Arrest Thief).
पोलिसांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून माहिती समजली की, आरोपी श्रीकांत निखाडे हा छत्रपूर, भोपाळ रोड तालुका सावनेर येथे एका धाब्यावर काम करत असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने आरोपी श्रीकांत जीवन निखाडेला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी आरोपी श्रीकांतकडे चोरीच्या मुद्देमालाबाबत बारकाईने सखोल विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यातील सोन्याचे दागिने त्याचे परीचीत प्रकाश मारोत्तराव पंचभाई याला विक्री केले, असे सांगितले. त्यावरुन पोलिसांनी प्रकाश पंचभाईला अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडे गुन्ह्यातील मुद्देमाल आणि सोन्याच्या दागिन्यांबाबत चौकशी केली असता त्याने ते दागिने सोनाराला विकल्याची माहिती पुढे आली. पंचभाईने स्वतःचे सोने असल्याचे खोटे बोलून तसेच वडिलाला कॅन्सरचा आजार आणि त्याच्या हृदयात छिद्र असल्याने उपचाराकरीता पैशाची अत्यंत गजर असल्याचे सांगून सोन्याचे दागिने विकल्याचं पुढे आल्यानंतर पोलिसांनी सोनाराकडून 395 ग्राम सोनं जप्त केले आहे. ज्याची किंमत 20 लाख रुपये इतकी आहे.
ड्रग्ज पेडलर्ससह चौघांना अटक, साडे तीन लाखांचा मुद्देमाल जप्त, नागपूर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाईhttps://t.co/DvTd2NFAyY#NagpurCrime #CrimeNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2020
Nagpur Police Arrest Thief
संबंधित बातम्या :
दहशत माजविण्यासाठी स्थानिक गावगुंडाकडून घरातील सामान, गाड्यांची तोडफोड, कल्याण पूर्वेतील प्रकार
पोलीस अधीक्षकांच्या नावे फेक फेसबुक अकाऊंट, लोकांकडे पैशांची मागणी, चंद्रपुरात खळबळ
टोळी युद्धातून नागपूरमध्ये दोघांची हत्या?; मृतदेह रस्त्यावर फेकल्याने खळबळ