नागपुरात पोपट हरवल्याची तक्रार; पोलिसांनी तातडीने शोधला, मालक म्हणाला…

| Updated on: Mar 05, 2020 | 8:55 PM

नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात एक अजब तक्रार आली. या पोलीस ठाण्यात चक्क पाळीव पोपट हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली.

नागपुरात पोपट हरवल्याची तक्रार; पोलिसांनी तातडीने शोधला, मालक म्हणाला...
Follow us on

नागपूर : माणूस हरवल्याची तक्रार पोलिसात होताना (Nagpur Police Found Missing Parrot) आपण अनेकदा बघितली असेल. मात्र, नागपूरच्या मानकापूर पोलीस ठाण्यात एक अजब तक्रार आली. या पोलीस ठाण्यात चक्क पाळीव पोपट हरविल्याची तक्रार दाखल करण्यात आली. विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेत हरवलेल्या पोपटाला शोधूनही काढलं.

नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात (Nagpur Police Found Missing Parrot) विनोदकुमार माहोरे राहतात. ते वेकोलीत वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे ‘आफ्रिकन ग्रे’ जातीचा ‘ब्राव्हो’ नावाचा पोपट होता. गेल्या मंगळवारी (3 मार्च) सायंकाळी ब्राव्हो पिंजऱ्यातून उडाला.

हेही वाचा : नागपूरमध्ये चौथ्या मजल्यावरुन उडी घेत 24 वर्षीय तरुणीची आत्महत्या

विनोदकुमार माहोरे यांनी त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, तो काही सापडला नाही. त्यानंतरमग माहोरे यांनी ब्राव्होच्या विस्तृत वर्णनासह मानकापूर पोलिसात तक्रार दिली.

पोलिसांनी ब्राव्हो बेपत्ता असल्याची नोंद घेत ‘मिसिंग नंबर’ दिला. पोपट आढळल्यास त्याची माहिती पोलिसांना देण्याच्या सूचनाही करण्यात आल्या. पोलिसांना वायरलेसद्वारे मेसेज दिले गेलेत. त्यावर काही पोलिसांनी आश्चर्यसुद्धा व्यक्त केलं. मात्र, या पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी ही बाब गांभीर्याने घेतली. कारण त्यांनी यापूर्वीही हरवलेली मांजर शोधून दिली होती.

हेही वाचा : बुलेटला फॅन्सी नंबर प्लेट, पोलिसांकडून मोठा दंड, दंडाची रक्कम…

पोलिसांनी हरवलेल्या पोपटाचा शोध सुरु केला. शोध घेत असताना पोलिसांना परिसरात एका झाडावर तो पोपट ‘ब्राव्हो’ बसलेला आढळून आला. तो पाळीव असल्याने त्याला त्याच्या नावाने आवाज दिला असता तो जवळ आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्या मालकाच्या सुपूर्द केलं.

पोपट हरविल्याची तक्रार पोलिसात देण्याआधी विनोदकुमार माहोरे यांनी खूप विचार केला. पोलीस आपल्यावर हसतील. ते याला किती गांभीर्याने घेतील, अशी शंका त्यांच्या मनात होती. मात्र, पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची दखल घेतली, याचा आनंद त्यांना झाला.

हेही वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप, फडणवीसांना हायकोर्टाची नोटीस

विनोदकुमार माहोरे यांचा पोपट परत मिळाल्याने त्यांनी पोलिसांचे खूप आभार मानले. आपल्याला नागपूर पोलिसांवर गर्व असल्याचं विनोदकुमार माहोरे यांनी सांगितलं. पोलिसांनी पोपट शोधून दिला, ही बातमी पसरताच (Nagpur Police Found Missing Parrot) सर्वत्र मानकापूर पोलिसांचं कौतुक होत आहे.