नागपूर : वाढदिवसाचा केक आणण्यास परवानगी न दिल्याने निराश झालेल्या तरुणाला पोलिसांनीच अनोखं सरप्राईज दिलं. नागपुरात पोलिसांनी चक्क या तरुणच्या घरीच केक पोहोचता केला. (Nagpur Police Birthday Cake Surprise)
लॉकडाऊनच्या काळात पोलिस 24 तास आपलं कर्तव्य बजावत आहेत. रस्त्यांवर फिरणाऱ्या लोकांना कधी दंडुक्यांनी तर कधी हात जोडून समजावून घरी राहण्याची विनंती करत आहेत. याही पलिकडे जात नागपूर पोलिसांनी वाढदिवस साजरा करता न आलेल्या तरुणाला घरीच केक नेऊन दिला.
लॉकडाऊनमुळे घराबाहेर पडता न आल्याने काही जणांना आपला वाढदिवस साजरा करता आला नाही, अशा व्यक्तींना त्यांच्या घरीच केक नेऊन देत एक वेगळं उदाहरण नागपूर पोलिसांनी ठेवलं आहे.
नागपूर पोलिसांच्या कंट्रोल रुमला पराग नावाच्या तरुणाचा फोन आला. ‘माझा वाढदिवस आहे, केक घ्यायला घराबाहेर पडता येईल का?’ अशी विचारणा त्याने केली. पोलिसांनी नकार दिल्याने पराग हिरमुसला.
हेही वाचा : नागपुरातील ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृताच्या संपर्कातील 37 जण पॉझिटिव्ह
पलिकडचा तरुण निराश झाल्याचं पोलिसांना जाणवलं. त्यामुळे त्यांनी परागच्या घरी केक नेऊन त्याला सरप्राईज दिलं. पोलिसांच्या या अनपेक्षित कृत्यामुळे परागला सुखद धक्का बसला. पोलिसांच्या या भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे. (Nagpur Police Birthday Cake Surprise)
#NagpurTrafficPolice #birthday #celebrate to Man#COVID19Lockdown #StayAtHome #StaySafe @DGPMaharashtra @CMOMaharashtra @AnilDeshmukhNCP @NagpurPolice pic.twitter.com/jB8cI9eFqi
— Nagpur Traffic Police (@trafficngp) April 21, 2020
दरम्यान, नागपुरात आज आणखी 7 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपुरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 88 वर पोहोचला आहे. महाराष्ट्रात एकूण 4 हजार 666 रुग्ण सापडले आहेत. तर भारतात आता कोरोनाचे 18 हजार 604 रुग्ण असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. देशभरातल्या कोरोनाबळींचा आकडा 590 वर गेला आहे. (Nagpur Police Birthday Cake Surprise)