मंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश

| Updated on: Sep 29, 2020 | 12:10 PM

पोलिसांनी या मुलीच्या पालकांकडून 18 वर्षांपर्यंत लग्न न करण्याचं हमीपत्र लिहून घेतलं आहे. (Nagpur Police Stop Girl Child marriage in City)

मंगलाष्टके सुरु होण्यापूर्वी लग्नमंडपात पोलिसांची एंट्री, नागपुरात मुलीचा बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश
Follow us on

नागपूर : लग्नाची तयारी झाली, लग्नसमारंभासाठी वऱ्हाडी लग्नमंडपी पोहोचले, मंगलाष्टकांच्या घोषणा सुरु होणार तेवढ्यात लग्नमंडपात पोलीस पोहोचले आणि 17 वर्षांच्या मुलीचा बालविवाह थांबवण्यात आला. नागपुरातील कामठी परिसरातील ही घटना घडली आहे. भर मंडपात अशाप्रकारे थरारक नाट्य घडल्यानंतर एकच गोंधळ उडाला. यानंतर पोलिसांनी या मुलीच्या पालकांकडून 18 वर्षांपर्यंत लग्न न करण्याचं हमीपत्र लिहून घेतलं आहे. (Nagpur Police Stop Girl Child marriage in City)

नागपूर जिल्ह्यातील जुनी कामठी इमलीबाग परिसरात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचे तिच्या आई-वडिलांनी लग्न जोडले. काल सोमवारी 28 सप्टेंबरला लग्नाची संपूर्ण तयारीही करण्यात आली. या लग्नासाठी वऱ्हाडी मंडपात जमले. नवरा-नवरी आल्यानंतर मंगलाष्टाके सुरु होण्यापूर्वी मंडपात पोलीस पोहोचले.

लग्न लागण्याच्या वेळेस त्या ठिकाणी पोलीस आल्याने काही काळासाठी या ठिकाणी गोंधळाचे वातावरण पसरलं होतं. त्यावेळी तिच्या आई-वडिलांकडे मुलीच्या जन्माचा दाखला मागण्यात आला. मात्र मुलीच्या आईवडिलांनी रडारड सुरु केली. पण त्याच वेळी पोलीस आणि जिल्हा बालसंरक्षण कक्षाने कायद्याचा धाक दाखवत कारवाई केली जाईल, असे सांगताच हे लग्न थांबवण्यात आलं.

तसेच ही मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिचे लग्न लावणार नाही, असं हमीपत्र मुलीच्या आईवडिलांकडून घेण्यात आलं. त्यानंतर ती मुलगी आईवडिलांसोबत घरी परत गेली. नागपुरातील पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे या ठिकाणी होणारा बालविवाह रोखण्यात यश आलं आहे. (Nagpur Police Stop Girl Child marriage in City)

संबंधित बातम्या : 

नागपुरात 15 वर्षीय तरुणीवर बलात्कार, चार आरोपींना अटक

नागपुरात ‘इराणी’ चेन स्नॅचर्सच्या मुसक्या आवळल्या, चोरीसाठी वापराचये ‘ही’ स्पेशल टेक्निक