नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपुरात पार पडतो आहे (RSS Vijayadashami Utsav). यंदाच्या विजयादशमीला पहिल्यांदाच स्वयंसेवकांच्या कवायती नाही. त्यामुळे आरएसएसच्या पारंपारिक दसऱ्या सोहळा यंदा खंडित झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा संघाचा स्थापना दिवस साधेपणाने आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करुन साजरा केला जात आहे. आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शस्त्रपूजन केलं, त्यानंतर उत्सवाला सुरुवात झाली. (RSS Vijayadashami Utsav mohan bhagvat speech)
कोरोनामुळं यंदाचा विजयादशमी उत्सव हा खुल्या मैदानात न होता सभागृहात होत आहे. नागपुरातील हेडगेवार सभागृहात हा उत्सव पार पडत आहे. त्यामुळे यंदा कुठलेही प्रात्यक्षिक झाले नाहीत. दरवर्षी या कार्यक्रमाला नागरिक आणि निमंत्रित मोठ्या संख्येनं सहभागी होतात. मात्र, यावर्षी फक्त 50 स्वयंसेवकांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडत आहे. प्रमुख अतिथी म्हणून कुणालाही आमंत्रित करण्यात आलेलं नाही.
कोरोनामुळे इतिहासात पहिल्यांदाच इतक्या कमी स्वयंसेवकांमध्ये दसरा मेळावा करण्याची वेळ – मोहन भागवत