नागपूर : ‘सारी’ आजाराने त्रस्त असलेल्या दोघा रुग्णांचा ‘कोरोना’ने नागपुरात मृत्यू झाला. हे दोन्ही रुग्ण जिल्ह्याबाहेरचे होते. नागपुरातील ‘कोरोना’बळींची संख्या आता 13 वर पोहोचली आहे. (Nagpur SARI Patients Dies of COVID)
सारीचा एक रुग्ण मध्य प्रदेशातून तर दुसरा अमरावतीवरुन नागपुरात उपचार घेण्यासाठी आला होता. या दोन्ही रुग्णांचा नागपूरच्या मेडीकलमध्ये ‘कोरोना’मुळे मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा संख्या 13 वर गेला आहे.
नागपूर जिल्ह्यात कालच्या दिवसात 13 नव्या ‘कोरोना’ग्रस्त रुग्णांची भर पडली. त्यामुळे नागपुरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 626 झाली आहे. भानखेडा, टिमकी, मोमीनपुरा परिसरात काल नव्या रुग्णांची नोंद झाली. नागपुरात लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेण्याचा पहिला टप्पा सुरु झाला, यातच रुग्णवाढ वेगाने होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हेही वाचा : नागपुरात मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यास कारवाई, तुकाराम मुंढेंचे आदेश
दुसरीकडे काल दिवसभरात नागपुरात 12 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.आतापर्यंत 417 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यास नागपुरात गुन्हेगारी कारवाई होऊ शकते. मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी गेल्यास सुरुवातीला दोनशे रुपये दंड आकारला जाईल. तीन वेळा दंड आकारल्यानंतर संबंधितावर कारवाई होणार.
कोरोनाला आळा घालण्यासाठी नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आदेश काढले आहेत. आजपासून नागपूर शहरात हे आदेश लागू असून मॉर्निंग वॉक असो किंवा खरेदी, सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक आहे.
संबंधित बातम्या :
राज्यात ‘पुनश्च हरिओम’, पहिला-दुसरा टप्पा आजपासून, काय सुरु काय बंद?
ऑफिस, हॉटेल, रेस्टॉरन्ट, धार्मिक स्थळं 8 जूनपासून सुरु होणार, गृहमंत्रालयाकडून नियमावली जाहीर
(Nagpur SARI Patients Dies of COVID)