नागपूर : नागपुरातील सतरंजीपुरा परिसर मध्य भारतातील ‘कोरोना’ साखळीचं सर्वात मोठं केंद्रबिंदू ठरत आहे. एकट्या सतरंजीपुरा परिसरात कोरोना रुग्णांनी शंभरी गाठली आहे. (Nagpur Sataranjipura Corona Hot Spot) काल दिवसभरात नागपुरात दोन नव्या कोरोना रुग्णांची भर पडल्याने कोरोना बाधितांचा आकडा 162 वर पोहोचला.
मध्य भारतात एकाच परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळणारं सतरंजीपुरा हे एकमेव ठिकाण आहे. या परिसरातील कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर उपाययोजना करत आहे.
68 वर्षीय कोरोनाबाधीत मृतकाच्या संपर्कात आल्याने सतरंजीपुरा परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढत गेला. या एका व्यक्तीच्या संपर्कात आल्याने 60 पेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. त्यानंतर इथली कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली.
हेही वाचा : मिशन सतरंजीपुरा, हॉटस्पॉटमुक्त करण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘मास्टर प्लॅन’
सतरंजीपुरा परिसरात कोरोना साखळी खंडीत करण्यासाठी मनपाकडून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. या भागातील साधारण 1700 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. इथल्या नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. या भागातली सर्व गल्ल्या सील करण्यात आल्या आहेत.
मिशन सतरंजीपुरा मास्टर प्लॅनमधील उपाययोजना
सतरंजीपुरा हा भाग दाटीवाटीचा आणि मोठ्या लोकसंख्येचा आहे. त्यामुळे प्रशासनाने तयार केलेल्या मास्टर प्लॅननुसार या भागाला सील करत नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले.
तुकाराम मुंढे त्यांच्या शिस्तप्रियतेसाठी आणि नियमांच्या कठोर अंमलबजावणीसाठी ओळखले जातात. त्यामुळे याचा नागपुरात लवकरच परिणाम होईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे याचा अंतिम परिणाम येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, नागपुरात आतापर्यंत 61 जणांनी कोरोनावर मात केली आहे. वडील आणि मुलगी कोरोनामुक्त झाल्याचं काल समोर आलं होतं. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये ‘कर्करोग’ग्रस्ताचाही समावेश आहे. नागपुरातील कोरोना बाधितांचा आकडा 162 वर पोहोचला आहे.
Corona Live Update : नागपुरात वाईन शॉप फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न https://t.co/MiMkiMHR2d
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 6, 2020