अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊन विदर्भाला न्याय देणार, नाना पटोलेंची माहिती

| Updated on: Nov 23, 2020 | 12:07 PM

कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूर ऐवजी मुंबईला होणार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊ, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले. (Nana Patole comment on Winter Session)

अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊन विदर्भाला न्याय देणार, नाना पटोलेंची माहिती
nana patole
Follow us on

भंडारा: उपराजधानी नागपूरला होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर राज्य सरकावर विरोधकांनी टीकास्त्र सोडले होते. विरोधकांच्या आरोपांना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी खोडून काढले आहे. कोरोनामुळे हिवाळी अधिवेशन यावेळी नागपूर ऐवजी मुंबईला होणार आहे. मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊ, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केले. (Nana Patole comment on Winter Session of Maharashtra Legislature)

कोरोनाचा फटका आता नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला बसणार असून त्यामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबई घेणार असल्याचे विधान सभा अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून हिवाळी अधिवेशन मुंबईला घेण्याचा निर्णय घेतला.

नागपूर विधिमंडळाच्या परिसरातील इमारतींचा वापर कोविड सेंटर म्हणून करण्यात येत आहे. राज्यातील कोरोनाची परिस्थिती सुधारल्यानंतर, कोरोनामुक्त झाल्यानंतर नागपूरला अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्यात येईल, असंही नाना पटोले यांनी सांगितले.

आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असल्याने विरोधकांकडून विदर्भावर अन्याय होत असल्याची टीका करण्यात येतेय, मात्र त्यामध्ये तथ्य नसल्याचे पटोले यांनी स्पष्ट केले. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेऊन विदर्भाला मोठा न्याय मिळेलअसे ऐतिहासिक अधिवेशन घेऊ, असही नाना पटोले यांनी सांगितले आहे. भंडारा येथे नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते.

भाजपचं टीकास्त्र

हिवाळी अधिवेशन सात डिसेंबरला मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीमध्ये घेण्यात आला होता. यामुळे नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. त्यावरून भाजपचे नेते गिरीश महाजन आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.

किमान 15 दिवस अधिवेशन व्हावे ही आमची भूमिका आहे. हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीची फार चर्चा करायची नाही, असं त्यांना वाटते. सरकार पळ काढण्याचा प्रयत्न करत आहे, अशी टीकाही गिरीश महाजन यांनी केली आहे. किमान बजेट अधिवेशन तरी नागपूरला व्हावे ही आमची मागणी आहे.

नागपुरातील अधिवेशन हा एक करार आहे. एक कायदा आहे. त्यामुळे डिसेंबरमधील अधिवेशन नागपुरात होणार नसेल तर मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन तरी नागपुरात घ्यावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली होती.

संबंधित बातम्या :

कोरोनाची खबरदारी घेऊन हिवाळी अधिवेशन नागपुरात घ्या, भाजप आमदारांची मागणी

हिवाळी अधिवेशनातील खर्च नागपुरातील आरोग्य यंत्रणेला द्या, काँग्रेस आमदाराचं मुख्यमंत्र्यांना पत्र

(Nana Patole comment on Winter Session of Maharashtra Legislature)