महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात एकवटलो, आता केंद्राचं सरकारही उलथून पाडू, नाना पटोलेंचं आवाहन

| Updated on: Dec 17, 2022 | 2:28 PM

केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रद्रोह्यांच्या विरोधात  एकवटलो, आता केंद्राचं सरकारही उलथून पाडू, नाना पटोलेंचं आवाहन
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांविरोधात आज जनता एकवटली आहे. लाखोंच्या संख्येने आंदोलक महामोर्चात सहभागी झाले आहेत. या एकजुटीनं महाराष्ट्रातील सरकारच नाही तर त्यांना अभय देणारं केंद्रातलं सरकारच उलथून टाकू, असं आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं. मुंबईत महाविकास आघाडी आयोजित महामोर्चा हल्लाबोल आंदोलनात त्यांनी सहभाग नोंदवला. मुख्य मंचावर भाषण करताना नाना पटोले यांनी भाजपवर सणकून टीका केली.

नाना पटोले म्हणाले, ‘महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात महाराष्ट्र एकत्रित झाला आहे. आज तिरंग्यात सगळा महाराष्ट्र एकत्रित आला. लाखोंच्या मोर्चात पहायला मिळतंय. राज्यपाल भवनातून आपल्या महाराष्ट्राच्या दैवताला अपमान करण्याचं काम राज्यपालांनी सुरुवात केलं. भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी कळस घातला. कर्मवीर भाऊराव पाटील, आंबेडकर, महात्मा फुले, या सगल्यांच्या अवमानाची मालिका भाजपाने सातत्याने केली गेली….

महाविकास आघाडीचे सगळे खासदार गृहमंत्र्यांना भेटले. राज्यपालांनी महाराष्ट्राच्या दैवताचा अपमान केला. त्यावरून निवेदन करून कारवाई करण्याची विनंती केली. पण कारवाई झाली नाही. नागपुरात झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यपाल बसलेले दिसून आले. म्हणजेच भाजपाचा खरा चेहरा अशा रितीने पुढे आला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

भाजप नेते सुधांशु त्रिवेदी यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची पाचदा माफी मागितली, असं बोलून कळस गाठला. या विरोधात जनतेच्या मनात मोठा आक्रोश आहे. सीमावादाचाही प्रश्न आहे. कधी नव्हे तर राज्यातील अनेक गावं, गुजरात, तेलंगणा, आंध्रात जाण्याची वातावरण निर्मिती आहे. मुंबईदेखील केंद्रशासित करण्याचा त्यांचा प्लॅन आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

महाराष्ट्राची अस्मिता कायम रहावी, यासाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. राज्यातील जनतेनं लाखोंच्या संख्येने उपस्थिती लावली. भाजपने तर आंदोलन करत आहे. चोराच्या उलट्या बोंबा, यानिमित्ताने हे चित्र सिद्ध झालं. केंद्राच्या सरकारला उलथून पाडण्याचा संकल्प आपण केला पाहिजे, अशी अपेक्षा नाना पटोले यांनी व्यक्त केली.