यवतमाळ: विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी यवतमाळ जिल्ह्यातील सानिका पवार या विद्यार्थिनीच्या घरी भेट दिली. दहावीची परीक्षा सुरु असताना सानिकाच्या शेतकरी वडिलांनी आत्महत्या केली होती. या संकटातही अभ्यास करुन सानिकाने दहावीला 97.60 टक्के गुण मिळवले. नाना पटोलेंनी सानिकाच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली असून अकरावीच्या शिक्षणाच्या खर्चाच्या रक्कमेचा खर्च धनादेशाद्वारे सानिकाला दिला. (Nana Patole take responsibility of Sanika Pawar Education )
सानिकाचे वडील सुधाकर पवार यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली. घरी वडिलांचा मृतदेह असताना सानिकाने दहावीची परीक्षा देत ९७.६० टक्के गुण प्राप्त मिळवले. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर नाना पटोले यांनी गुणवंत सानिकाशी विधानभवनातून दूरध्वनीद्वारे संपर्क साधून तिचे कौतुक केले होते. तसेच लवकरच भेटायला तुझ्या घरी येईल असे आश्वासन दिले होते.
सानिका पवार हिच्या घरी थेट विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी आज भेट दिली. नाना पटोले यांनी हिवरी येथील सानिकाच्या घरी भेट देऊन तिला शाबासकी देत तिच्या शिक्षणाचा खर्च स्वीकारला. सानिकाला इयत्ता 11वी मध्ये लातूर येथील शाहू महाराज महाविद्यालयात पुढील शिक्षणासाठी तिचा प्रवेश करून देण्यात आला आहे. चालू वर्षीचा 1 लाख 30 हजार रुपयांचा शैक्षणिक खर्च तिला धनादेशाद्वारे सोपविण्यात आला.
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सानिकाच्या पुढील संपूर्ण शैक्षणिक खर्चाची जबाबदारी स्वीकारली आहे. तिने वैद्यकीय शिक्षण पूर्ण करून प्रशासकीय सेवेत यावे, ही तिची इच्छा पूर्ण होईल, असा आशीर्वाद नाना पटोलेंनी देत सानिकाच्या कुटुंबियांची चौकशी देखली केली.
संबंधित बातम्या:
पावसाळी अधिवेशन दोन दिवसांवर असताना विधानसभा अध्यक्षांना कोरोना, नाना पटोले होम क्वारंटाईन
EXCLUSIVE : नाना पटोले पुन्हा दिल्ली दौऱ्यावर, नेमकं कारण काय?
(Nana Patole take responsibility of Sanika Pawar Education )