नांदेड : नांदेडचे भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यातच त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली होती. त्यानंतर अवघ्या महिन्याभरातच पुन्हा त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती चिखलीकरांनी दिली. (Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Again tested Corona Positive)
प्रताप पाटील चिखलीकर यांना 7 ऑगस्टला कोरोनाची लागण झाली आहे. त्यापूर्वी त्यांच्या मुलाची कोरोना चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर ते कोरोनामुक्त झाले होते.
मात्र पुन्हा महिन्याभरात प्रताप पाटील चिखलीकरांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सध्या दिल्लीतील निवासस्थानी वास्तव्यास आहेत. माझी प्रकृती उत्तम असल्याचा माहिती चिखलीकरांनी दिली आहे.
दरम्यान मार्च महिन्यापासूनच चिखलीकर पिता-पुत्र दोघेही सातत्याने मतदारांच्या संपर्कात आहेत. त्यातून त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यावेळी चिखलीकर यांच्या संपर्कात आलेल्या अन्य सात जणांची चाचणीही कोरोना पॉझिटिव्ह आली होती.
नांदेडमधील कोरोना पॉझिटिव्ह लोकप्रतिनिधी
1) अशोक चव्हाण (आमदार- भोकर, काँग्रेस) – कोरोनामुक्त
2) मोहन हंबर्डे (आमदार- नांदेड दक्षिण, कॉंग्रेस ) – कोरोनामुक्त
3) अमरनाथ राजूरकर (आमदार – विधानपरिषद, कॉंग्रेस) – कोरोनामुक्त
4) माधव जवळगावकर (आमदार- हदगाव, कॉंग्रेस) – कोरोनामुक्त
5) प्रवीण पाटील चिखलीकर (नांदेड जिल्हा परिषद सदस्य) – कोरोनामुक्त
6) प्रताप पाटील चिखलीकर (खासदार- नांदेड, भाजप) – कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा लागण (Nanded BJP MP Pratap Patil Chikhalikar Again tested Corona Positive)
संबंधित बातम्या :
नांदेडमध्ये लोकप्रतिनिधींना कोरोनाचा विळखा, चार आमदारांनंतर आता खासदारालाही लागण
वेळेवर उपचारासाठी न आल्याने 80 टक्के मृत्यू, नागपूर महापालिकेकडून कोरोना मृत्यूंचे विश्लेषण