वॉशिंग्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाची मंगळ मोहिम सध्या चांगलीच चर्चेत आहे. नुकताच नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरने (रोबोट) मंगळावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी खोदकाम करताना आपला सेल्फी काढला. यात हा रोबोट मंगळावरील एका ठिकाणचे नमुने गोळा करताना खोदकाम करताना धुळीने माखलेल्या स्थितीत दिसत आहे. क्युरॉसिटी रोव्हर मंगळावरील विविध ठिकाणी जाऊन तेथील मातीचे नमुने गोळ करत आहे. क्युरॉसिटी रोव्हरचा हा सेल्फी मंगळावरील ‘मेरी अॅनिंग’ या ठिकाणाचा आहे (NASA Curiosity Rover clicks new Dust covered selfie on Mars during mission).
क्युरॉसिटी रोव्हर मंगळावरील या भागात जुलै 2020 पासून काम करत आहे. हा रोबोट या भागातील विविध ठिकाणी जाऊन तेथील मातीचे विविध खोलीवरील नमुने गोळा करतो आणि त्यात काही जीवाष्माचा अंश सापडतो का हे तपासत आहे. हे सर्व मंगळावरील जीवसृष्टीच्या संशोधनासाठी सुरु असलेल्या मोहिमेचा भाग आहे.
Look cute – and I won’t delete later.
Greetings from the Red Planet! I took another selfie as I explored a new spot dubbed “Mary Anning,” where I’m analyzing drill samples. I conducted experiments on them in my continued search for organic molecules. https://t.co/NKTjxVNjX7 pic.twitter.com/GynSQifLQC
— Curiosity Rover (@MarsCuriosity) November 12, 2020
नासाच्या क्युरॉसिटी रोव्हरचा थेट मंगळावर सेल्फी, धुळीने माखलेला फोटो नंतर डिलीट करणार नसल्याचं मिश्किल ट्विट
नासाने दिलेल्या माहितीनुसार, नुकताच क्युरॉसिटी रोव्हरने पाठवलेला सेल्फी 59 फोटोंना इमेज स्पेशालिस्टने एकत्र करुन तयार झालेला आहे. हा सेल्फी 25 ऑक्टोबर रोजी काढण्यात आला. क्युरॉसिटी रोव्हरचा हा मंगळावरील 2 हजार 922 वा दिवस आहे.
क्युरॉसिटी रोव्हरने या सेल्फीसोबत म्हटलं आहे, “मंगळावरुन सर्वांना शुभेच्छा. मी एकदम निरागस दिसतोय आणि हा फोटो मी नंतर डिलीट करणार नाही. मी हा सेल्फी मंगळावरील मेरी अॅनिंग या नव्या ठिकाणी खोदकाम करुन नमुने गोळा करत असताना काढला आहे. मी जीवाष्माचे अंश शोधण्याच्या मोहिमेसाठी या नमुन्यांचं परिक्षण करत आहे.”
दरम्यान, क्युरॉसिटी रोव्हर नोव्हेंबर 2011 मध्ये लाँच करण्यात आलं होतं. हा रोबोट ऑगस्ट 2012 मध्ये मंगळावर लँड झाला. तेव्हापासून क्युरॉसिटी रोव्हर मंगळावर जीवसृष्टीचा अंश शोधण्याच्या मोहिमेवर आहे. सध्या हा रोबोट मंगळावरील मेरी अॅनिंग या भागातील नमुने गोळ करत आहे. या ठिकाणी या रोबोटने आपल्या ड्रिल आणि रोबोटिक हातांनी तीन खड्डे केले आहेत. यातून वेगवेगळे नमुने गोळ करत त्याची चाचणी सुरु आहे.
संबंधित बातम्या :
नासाच्या ‘मार्स लँडर’चं मंगळावर यशस्वी लँडिंग
NASA Curiosity Rover clicks new Dust covered selfie on Mars during mission