नाशिक : नाशिक शहरात उद्या (21 मे) आणि परवा पाणीबाणीचा (Water shortage) सामना करावा लागणार आहे. नाशिक महापालिकेनं याबाबतची माहिती दिली आहे. नाशिक शहरात (Nashik City) शनिवारी आणि रविवारी पाणी पुरवठ्यात कपात होणार आहे. 21 मे रोजी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून 22 मे रोजी पाणी पुरवठा कमी दाबाने केला जाण्याची शक्यता आहे. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी नाशिकच्या पाणी पुरवठ्यावर परिणाम जाणवरणार आहे. त्यामुळे नाशिककरांना (Nashik Water News) पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. 21 मे रोजी नाशिकच्या संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद असणार आहे. तर रविवारी नाशिकमध्ये पूर्ण क्षमतेनं पाणी पुरवठा होणार नसल्यानं पाण्याची कमतरता जाणवण्याची शक्यता आहे. परिणामी लोकांनी आजपासूनच पाणी जपून वापरावं आणि पाण्याचा अपव्यय टाळावा, असं आवाहन केलं जातंय.
नाशिक शहरात महावितरणकडून ओव्हरहेड लाईनसह सबस्टेशनचं पावसाळ्याआधीचं काम करण्यात येणार आहे. हे काम करण्यासाठी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्यामुळे पाणी पुरवठा प्रभावित होणार आहे.
नाशिक पश्चिम आणि पंचवटी विभागाकडून जलशुद्धीकरण केंद्राकडे जाणारी अशुद्ध पाण्याची मुख्य वाहिनी दुरुस्त करण्यात येणार आहे. यासाठी शनिवारी दुपार आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा होणार नाही. तर रविवारी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबानं केला जाणार आहे.
पाणी पुरवठा कमी होणार असल्यानं नाशिक शहरातील लोकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येतंय. दोन दिवस पाणीबाणीचा सामना करावा लागू नये, यासाठी नागरिकांनी अतिरीक्त पाणी साठा जपून ठेवावा. त्याचप्रमाणे पाण्याची नासाडी होणार नाही, याची काळजी घ्यावी, असंही आवाहन करणयात आलंय.