नाशिकमध्ये 22 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एकूण बाधितांचा आकडा 1,315 वर

| Updated on: Jun 03, 2020 | 7:47 PM

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं थैमान (Nashik Corona Cases Update) अद्यापही सुरु आहे. नाशकात आज कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची भर पडली.

नाशिकमध्ये 22 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, एकूण बाधितांचा आकडा 1,315 वर
Follow us on

नाशिक : नाशिक जिल्ह्यात कोरोनाचं थैमान (Nashik Corona Cases Update) अद्यापही सुरु आहे. नाशकात आज कोरोनाच्या 22 नव्या रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1,315 वर गेला आहे. त्यामुळे धोका वाढण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. प्रशासन ही आता काहीसं हादरल्याच्या स्थितीत आहे. दिवसागणिक वाढणारा हा आकडा प्रशासनाच्या आणि नागरिकांच्या चिंतेत (Nashik Corona Cases Update) भर टाकणारा आहे.

मालेगावमध्य रुग्ण वाढत असताना जिल्ह्यातील इतर भागात मात्र संसर्ग तितका वाढला नव्हता. मात्र, आताच्या स्थितीत मालेगाव कुठेतरी आटोक्यात येण्याची शक्यता असताना इतर भागातही रुग्ण संख्या वाढू लागल्याने अधिक धोका निर्माण झाला आहे. यात नाशिक शहराचाही समावेश असल्याने प्रशासनही अलर्ट झालं आहे.

शहरातील वडाळा गावात जास्त रुग्ण असल्याने महापालिकेने खबरदारी म्हणून संपूर्ण गाव सील केलं. या परिसरात कुणालाही जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा आरोग्य विभागाने केलं (Nashik Corona Cases Update) आहे.

एकाच कुटंबातील 14 जणांना कोरोना

सकाळी प्राप्त झालेल्या अहवाला नुसार मनमाड शहरातील तब्बल 14 रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यात 4 ते 6 वर्षीय मुलांचाही समावेश आहे. तर हे सर्व रुग्ण एकाच कुटुंबातील असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता मनमाड शहरावर ही कोरोनाचं संकट गडद होत चाललं आहे.

आतापर्यंत 800 च्यावर रुग्ण कोरोनामुक्त

प्राप्त झालेल्या अहवालानुसार 22 रुग्णांपैकी येवला 2, नांदगाव 2, मनमाड 15, आडगाव 1, इगतपुरी 2 आहेत. मात्र, रुग्ण जरी मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी दिलासादायक बाब म्हणजे 800 च्यावर रुग्ण हे ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाच्या प्रयत्नांना ही यश येताना (Nashik Corona Cases Update) दिसतं आहे.

हेही वाचा :

CYCLONE NISARGA LIVE | चक्रीवादळाचा दुसरा बळी, रायगडनंतर पुण्यातही एकाचा मृत्यू

बीकेसीमधील कोविड 19 केंद्रालाही चक्रीवादळाचा जोरदार फटका, नितेश राणेंकडून व्हिडीओ पोस्ट करत टीका

संकट टळलं, यंत्रणा सज्ज होती, आता देवाकडे प्रार्थना, हे वादळ देशाबाहेर जावं : अस्लम शेख