नाशिक : नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी 5 पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही कारवाई केली. (Nashik Deolali Camp Firing Police Personnel Suspended)
तडीपार गुंडाने बिट्टू पवार नावाच्या युवकावर हल्ला करुन गोळीबार केल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला होता. हा संपूर्ण प्रकार घडत असताना या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यात कुचराई केल्याचा आरोप आहे. बिट्टू पवार हा छावणी परिषदेचे सदस्य असलेले वंचित बहुजन आघाडीचे नेते विलास पवार यांचा मुलगा आहे.
विश्वास नांगरे पाटील यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. यामधे दोन पोलिस हवालदार आणि तीन पोलिस शिपायांचा समावेश आहे.
हेही वाचा : आधी नाशिकच्या पठ्ठ्याचा 8 क्वार्टर रिचवण्याचा ध्यास, आता नांगरे पाटलांचे वाईन शॉप्स बंद करण्याचे आदेश
देवळाली कॅम्प परिसरात मद्यखरेदी करण्याचा वादातून गोळीबार झाल्याची माहिती आहे. अवघ्या 4 तासात देवळाली कॅम्प पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या संशयितांना अटक केली होती. सनी बाजीराव कदम, भुपाल मुनिंद्र कनोजिया, प्रकाश संजय साळवे आणि गणेश मारुती साळवे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
VIDEO : Nashik Corona Breaking : नाशिकमध्ये 2 नवजात बालकांना कोरोनाची लागण#Nashik #NashikCorona #CoronaWarriors #coronavirus #Covid_19india pic.twitter.com/37ErVzON9Y
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 12, 2020