नाशिक : ‘कोरोना’मुळे आर्थिक संकटात सापडलेल्या गरीब वर्गासाठी सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे. नाशिकच्या शेतकऱ्याने आपल्या शिवारातील गहू गरजू व्यक्तींना देण्याचा दानशूरपणा दाखवला आहे. (Nashik Farmer distribute wheat)
नाशिकमधील शेतकरी दत्ताराम पाटील यांनी आपल्या शेतातील तीन एकर जमिनीपैकी एका एकरवर पिकलेला गहू गरजू व्यक्तींना दान करण्यास सुरुवात केली आहे. दत्ताराम पाटील सपत्नीक आपल्या शिवारात उभं राहून गरजूंना गव्हाचं वाटप करत आहेत.
निफाड तालुक्यातील कसबे-सुकेणे येथील दत्ता पाटील यांनी आज त्यांच्या शेतातील गव्हाची रास गावातील गोरगरीब व हातमजुरांना खुली करून दिली. कोरोनामुळे कसबे-सुकेणे येथील सर्व गोरगरीब जनतेचे अर्थचक्र ठप्प आहे. द्राक्ष खुडे, शीतगृहे, निर्यात केंद्रे बंद असल्याने कसबे सुकेणेतील मजुर वर्गाचे हाल होत आहेत.
दत्ता पाटील यांच्या शेताजवळ एक वस्ती आहे. या वस्तीवरील काही कुटुंब अन्नधान्य संपल्राने उपाशी झोपत असल्याचे दत्ता पाटील यांना समजले. त्यांनी तत्काळ शेतात जाऊन नव्याने काढलेल्या गव्हाची रास या कुटुंबांना खुली करून दिली. कोरोना विषाणु संसर्ग प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता सूचनांचे पालन करत सुरक्षित अंतराने गव्हाचे वाटप सुरू केले आहे (Nashik Farmer distribute wheat)
‘मी लहानसा शेतकरी आहे. आम्ही काही आर्थिकदृष्ट्या फार संपन्न नाही, पण आमच्याकडे एक चपाती-भाकर असेल, तर त्यातील अर्धी गरजूंना देऊच शकतो’ अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत. दत्ता पाटलांची माणुसकी आणि सेवाभाव पाहून या कुटुंबांना अश्रू अनावर झाले. तर दत्ताभाऊंना दान करतानाही समाधान वाटले.
Maharashtra: A farmer from Nashik is distributing wheat harvested from 1 acre of his 3-acre land to needy.Datta Ram Patil says,”I am a small farmer.We’re not financially stable but if we have 1 chapatti then we can give half to others who are in dire need”. #CoronaLockdown (28.3) pic.twitter.com/lesfKF0Js3
— ANI (@ANI) March 29, 2020
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचं थैमान सुरुच आहे. लॉकडाऊननंतरही महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर पोहोचली आहे. आज मुंबईत 4, जळगावमध्ये 1, सांगली 1, नागपूर 1 असे रुग्ण सापडले. यामुळे आरोग्य यंत्रणांच्या काळजीत वाढ झाली आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी आता राज्य सरकारने खासगी रुग्णालयांची मदतही घेण्यास सुरुवात केली आहे. स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली.
Nashik Farmer distribute wheat