नाशिक : नाशकात गॅरेज मालकाच्या डोक्यात पाना घालून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती (Nashik Garage Owner Murder). नाशिक पोलिसांनी अवघ्या पाच तासात या हत्येचा छडा लावत एकाला अटक केली. ही व्यक्ती गॅरेजमध्ये काम करणारा कारागीर होता. मालकासोबत झालेल्या किरकोळ वादातून या कारागिराने मालकाची हत्या केल्याचं समोर आलं आहे (Nashik Garage Owner Murder).
नाशिकमधील इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनाचा पाच तासात पोलिसांनी छडा लावला. कारागिरानेच किरकोळ वादातून मालकाची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं. गॅरेज मालक रामचंद्र निषाद यांची डोक्यात लोखंडी पाना घालून निर्घृण हत्या करण्यात आली होती. यासंदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह इंदिरानगर पोलीस पथक आरोपीचा शोध घेत होते.
निषाद यांच्याकडे काम करणारा कारागीर रोशन कोटकर याच्यावर पोलिसांचा संशय होता. कारण, रोशनचे मालक रामचंद्र निषाद यांच्यासोबत काही किकोळ कारणावरुन वादही झालेले होते. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिक बळावला होता.
पोलिसांनी लागलीच कोटकर आणि त्याचा साथीदार महेश लभडे याला येवला येथून ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनीच हत्या केल्याची कबुली दिली. याप्रकरणी या दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.
मनसे शहर उपाध्यक्ष राकेश पाटील हत्या प्रकरणात मुख्य आरोपीला अटक, 13 दिवसांमध्ये गुन्ह्याचा छडाhttps://t.co/XCIRvyzljS
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 12, 2020
Nashik Garage Owner Murder
संबंधित बातम्या :
मुंबईत मिठाई देतो सांगून व्यापाऱ्याला लुटलं, दोघांना अटक, तर एक चोर धारदार चॉपर दाखवून फरार
एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेली व्हॅन पळवली, व्हॅन चालकानेच 4 कोटींवर डल्ला मारल्याचा अंदाज