नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाने अक्षऱश: थैमान घातलं आहे. अनेक खासगी रुग्णालयात कोरोना रुग्णांची लूट सुरु आहे. असे असतानाही नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी मात्र घरात बसून आहेत, असा आरोप मनसेने केला आहे. तसेच मनसेच्या वतीने सतीश कुलकर्णी यांना च्यवनप्राशची बॉटल भेट देण्यात आली आहे. (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni)
नाशिकमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा चार हजारच्या पार पोहोचला आहे. तर मृत्यूंचा आकड्यातही वाढ होत आहे. नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. मात्र या ठिकाणचे महापौर कोणत्याही रुग्णालय, कोविड सेंटरला भेट देत नाहीत. तसेच, बाहेरही पडत नाही. त्यामुळे नाशिककरांना आधार कसा मिळणार असा प्रश्न मनसेच्या वतीन करण्यात आला आहे.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
त्यामुळे मनसेने नाशिकच्या महापौरांना च्यवनप्राश दिले आहे. “महापौरांनी च्यवनप्राश घ्या, तंदुरुस्त व्हा. त्यानंतरच नागरिकंच्या कामासाठी घराबाहेर पडा,” असा खोचक सल्ला मनसे कार्यकर्त्यांनी महापौरांना दिला (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni) आहे.
नाशिकमध्ये 7 हजार 316 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 4 हजार 209 रुग्ण बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 300 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव वाढला आहे. यामुळे आता शहरवासियांची चिंता वाढू लागली आहे. दिवसागणिक नाशिक शहरात, ग्रामीण भागात कोरोना रुग्ण समोर येत असल्याने प्रशासनाचीही धावपळ उडाली आहे. त्यात नाशिक शहर आता कोरोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हा आरोग्य विभागही चिंतेच्या गर्तेत अडकला (Nashik MNS Gift Chyawanprash to Mayor Satish Kulkarni) आहे.
Pune Lockdown | सरकारनं अफू घेऊन निर्णय घेतलाय का? पुणे लॉकडाऊनवर मनसेचा सवालhttps://t.co/9InEKGH5KR#Pune #Lockdown #MNS@mnsadhikrut
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 13, 2020
संबंधित बातम्या :
Nashik Curfew | नाशिक शहरात पुन्हा संचारबंदी, संध्याकाळी सातनंतर बाहेर पडल्यास कारवाई
नाशिक महापालिका आयुक्त हायरिस्कमध्ये, स्वीय सहाय्यकाला कोरोना, जिल्हा परिषदेतही शिरकाव