नाशिक : लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांद्याचे बाजार भाव हे 3 हजार रुपयांच्यावर गेले (Onion Farmers Rasta Roko). मात्र, केंद्र सरकारने कुठलीही पूर्वसूचना न देता निर्यातबंदी केली. त्यामुळे आज (15 सप्टेंबर) कांद्याच्या भावात सोमवारच्या तुलनेत एक हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे लासलगाव, विंचूर, उमराणे, पिंपळगाव बसवंतसह जिल्ह्यातील विविध ठिकाणी कांद्याचे लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करुन आपला संताप व्यक्त केला (Onion Farmers Rasta Roko).
जोपर्यंत कांद्याची निर्यातबंदी उठत नाही आणि कांद्याला तीन हजार रुपयांच्या जवळपास बाजार भाव मिळत नाही, तोपर्यंत कांद्याचा लिलाव सुरु होऊ देणार नाही, असा पवित्र कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी घेतला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यात आज दिवसभर कांद्याचा लिलाव झाला नाही.
दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश, त्याशिवाय चीनमध्ये मुसळधार पाऊस झाल्याने नवीन लाल कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. तर पाकिस्तानमध्ये साठवलेला कांदाही खराब झाल्यामुळे राज्यातील गाडीत पाठवलेल्या उन्हाळा कांद्याला मागणी वाढल्यामुळे आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या लासलगाव बाजार समितीत सोमवारी कांद्याचे लिलाव सुरु झाले आणि कांदा बाजार भावाने तीन हजारी पार केली.
जास्त निर्यात होऊ नये, देशात कांद्याचा तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात आणण्यासाठी मुंबई, चेन्नई पोर्टसह बांग्लादेश सीमेवर निर्यात होणारा कांदा थांबल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे काल बाजार भाव 500 ते 600 रुपयांची घसरला होता. संध्याकाळी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा निर्यात बंदीवर शिक्कामोर्तब केला (Onion Farmers Rasta Roko).
अचानक कांदा निर्यातबंदी केल्यामुळे व्यापार्यांनी बाजार समित्यांमध्ये लिलावासाठी असमर्थता दर्शवली. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी कांदा लिलाव सुरु करण्याची मागणी केली आणि लासलगाव येथे चार ते पाच वाहनातील कांद्याचा लिलाव झाला. आमच्या कांद्याला जास्तीत जास्त 2200 रुपये, सरासरी 1900 रुपये आणि कमीत कमी 1280 रुपये इतका बाजार भाव जाहीर होतात.
शेतकऱ्यांनी निर्यात बंदी उठली पाहिजे, केंद्र सरकारचा निषेध असो, अशा घोषणाबाजी करत कांद्याचे लिलाव बंद पाडले. तर विंचूर येथे केंद्र सरकारची तिरडी नाशिक, औरंगाबाद राज्यमार्गावर आणून ठेवत जाहीर निषेध केला. तर उमराणे येथे मुंबई आग्रा महामार्ग बंद करत निर्यातबंदी आणि बाजार भाव घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी निषेध करुन आपला संताप व्यक्त केला.
डिसेंबर महिन्यात लासलगाव बाजार समिती लाल कांद्याला 11,111 रुपये इतका उच्चांकी ऐतिहासिक बाजार भाव मिळाला होता. कांद्याचे दोन रुपये मिळतील, या अपेक्षेने मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादकांनी लागवड केली आणि कांद्याचे बाजार भाव 1000 रुपयांच्या विक्री होत असल्याने कांदा उत्पादकांनी आपला काढलेला कांदा हा चाळीस साठवून ठेवला होता. मात्र, दमट हवामान आणि पावसाळी वातावरणामुळे मोठ्या प्रमाणात साठवलेला कांदा सडला.
त्यामुळे उत्पादन खर्च वाढला. आज मिळणारा अडीच ते तीन हजार रुपये बाजार भाव हा फक्त उत्पादन खर्च असल्याने केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय मागे घेण्यात यावा आणि पूरक कांद्याचे लिलाव सुरु करत तीन हजार रुपयांच्या जवळपास बाजार भाव मिळावे, अशी मागणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
‘व्यापाऱ्याला मोठं न करता शेतकरी हिताचा निर्णय घ्या’, कांदा निर्यात बंदीवर शरद पवार आक्रमकhttps://t.co/bdTewXHyaP#OnionExport #SharadPawar #PiyushGoyal
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 15, 2020
Onion Farmers Rasta Roko
संबंधित बातम्या :
केंद्राकडून कांदा निर्यातबंदी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट, स्वाभिमानीचा आंदोलनाचा इशारा