मराठवाड्याचं वैभव, 91 टक्के भरलेल्या ‘नाथसागरा’चे ड्रोन फोटो
आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.
1 / 10
आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख असलेलं जायकवाडी धरण यावर्षी 91 टक्के भरलं आहे. पण जायकवाडी धारणाखालच्या परिसरात समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे, जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे उघडून गोदावरी नदीत पाणी सोडायला सुरुवात करण्यात आली आहे.
2 / 10
जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धा फुटाने उचलून तब्बल 5700 क्युसेक्सने हा पाण्याचा विसर्ग करणयात येत आहे. त्यामुळे जायकवाडी धारणाखाली असलेल्या नदी काठावरील नागरिकांना याचा फायदा होणार आहे.
3 / 10
जायकवाडी धरणाच्या खाली जालना, परभणी आणि नांदेड हे जिल्हे येतात. तर गोदावरी नदीला पाणी सोडल्यामुळे नांदेड आणि परभणी या दोन जिल्ह्यांना त्याचा थेट फायदा होणार आहे. औरंगाबाद, जालना, बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या नदी काठावरील असंख्य गावं आणि शेतीला सुद्धा याचा मोठा लाभ होणार आहे.
4 / 10
जायकवाडी धरणाच्या उजव्या आणि डाव्या कालव्याद्वारे सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. उजव्या कालव्याद्वारे सुरू करण्यात आलेल्या विसर्गामुळे बीड जिल्ह्यातील महत्वाचं धरण असलेलं माजलगाव धरण आता भरू लागलेलं आहे.
5 / 10
माजलगाव धरणातून परळीच्या औष्णिक वीज निर्मिती केंद्राला पाणी पुरवठा केला जातो. बऱ्याचदा या केंद्राला पाणी पुरवठा कमी झाल्यामुळे या केंद्रातून वीज निर्मिती बंद करावी लागते. पण यावर्षी जायकवाडी धरणातून विसर्ग सुरू करण्यात आल्यामुळे परळीचं औष्णिक वीज निर्मिती केंद्र पूर्ण क्षमतेने चालू राहू शकणार आहे.
6 / 10
जायकवाडी धरणाच्या पाण्यावर तब्बल 2 लाख 63 हजार हेक्टर शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो, या शेतीसाठी डाव्या आणि उजव्या कालव्याद्वारे पावसाळच्या शेवटी हिवाळा आणि उन्हाळ्यात अनेक आवर्तने सोडली जातात त्यामुळे मराठवाड्यातील शेती ही भिजव्याखाली येत असते.
7 / 10
60 किलोमीटरची लांबी आणि दहा किलोमीटरची रुंदी इतका मोठा पसारा असलेल्या या नाथसागराची आशिया खंडातलं सर्वात मोठं मातीचं धरण अशी ओळख आहे.
8 / 10
जायकवाडी धरणाची तब्बल 102 टीएमसी पाणीसाठ्याची क्षमता आहे. हे धरण एकदा पूर्ण भरलं तर दोन वर्षाच्या शेतीच्या पाण्याची आणि 4 वर्षांच्या पिण्याची पाण्याची सोय होते. म्हणून या धरणाला मराठवाड्याचा छोटा समुद्र समजला जातो.
9 / 10
पाहा आणखी फोटो
10 / 10
पाहा आणखी फोटो