नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा, विजेत्यांना खेळण्यातील विमान आणि हेलिकॉप्टर

| Updated on: Sep 03, 2020 | 8:35 PM

खड्ड्यांमधून "लांब उडीची" स्पर्धा घेऊन मनसेने आपला निषेध नोंदवला.

नवी मुंबईत मनसेचं अनोखं आंदोलन, खड्ड्यांमध्ये लांब उडी स्पर्धा, विजेत्यांना खेळण्यातील विमान आणि हेलिकॉप्टर
Follow us on

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या विरोधात घणसोली (MNS Protest Against Pot Holes) येथे अनोखं आंदोलन केले. यावेळी खड्ड्यांमधून “लांब उडीची” स्पर्धा घेऊन मनसेने आपला निषेध नोंदवला. इतकंच नाही तर विजेत्या स्पर्धकांना खेळण्यातील विमानं आणि हेलिकॉप्टर देऊन त्यांना गौरविण्यात आले (MNS Protest Against Pot Holes).

प्रत्येक वर्षी रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याकरिता महापालिका करोडो रुपयांचा चुराडा करते. परंतु सर्व सामान्य नवी मुंबईकर जनतेला मात्र खड्डे चुकवत, आपला जीव मुठीत धरतच प्रवास करावा लागत आहे, असं मत मनसेचे संदिप गलुगडे यांनी व्यक्त केले.

येत्या 7 दिवसांत जर रस्त्यांचे खड्डे बुजवण्यात आले नाही, तर मनसे अधिक आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही मनसेने यावेळी दिला. यावेळी मनसेचे संदीप गलुगडे, सह-सचिव शरद डीगे, विभाग अध्यक्ष गणेश वाडकर, उपविभाग अध्यक्ष शिवाजी मुंडकर मनसेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते (MNS Protest Against Pot Holes).

संबंधित बातम्या :

कोरोना काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार, नवी मुंबईतून थेट दक्षिण आफ्रिकेत निर्यात

पोटच्या मुलीला वेश्या व्यवसायात ढकलण्याचा प्रयत्न, एक लाखात सौदा करणारी नवी मुंबईची महिला गजाआड