नवी मुंबई : वाढीव दराने देयके वसूल करीत कोरोना रुग्णांची आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी रुग्णालयांच्या विरोधात मनसेने नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली आवाज उठविल्यानंतर महानगरपालिकेने या रुग्णालयांना दणका दिला आहे. सप्टेंबर महिन्यात 32 लाख तर आता ऑक्टोबर महिन्यात 1 कोटी रुपये रुग्णांना परत करण्यात आले आहेत (Navi Mumbai Private Hospitals returns 1 Crore extra bills to Corona Patients after MNS slams).
मनसेने सलग या रुग्णालयांच्या मुजोरी विरोधात आवाज उठविल्यानंतर गेल्या महिन्यात या रुग्णालयांवर कारवाई करा अन्यथा मनपा आयुक्तांना खाजगी हॉस्पिटलचे तारणहार म्हणून मोर्चा काढून पुरस्कार देण्याचा इशारा मनसेने दिला होता. त्यानंतर मनपाने खाजगी रुग्णालयांच्या बिल तक्रारी संदर्भात हेल्पलाईन नंबर तसेच स्वतंत्र्य देयक तपासणी केंद्राची निर्मिती केली होती.
मागे ३२ लाख आता १ कोटींची रक्कम काेविड रुग्णांना परत..
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठपुराव्याला यश
नवी मुंबई मनपाची खाजगी रुग्णालयांवर कारवाई..@mnsadhikrut @abpmajhatv @zee24taasnews @saamTVnews @TV9Marathi @News18lokmat @JayMaharashtrN @mataonline @pudharionline @MiLOKMAT pic.twitter.com/7aljWhM1TC— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) October 12, 2020
या ‘कोव्हिड-19’ कालावधीतील पाचही महिन्यातील एकूण एक बिलाचे ॲाडिट करुन ज्यादा घेतलेले पैसे रुग्णांना परत करावे, अशी मागणी मनसेने कायम लावून धरली होती. त्यानंतर सप्टेंबरमध्ये नवी मुंबईतील विविध रुग्णालयांच्या बिलाचे ऑडिट करुन 32 लाख रुपये रुग्णांना परत करण्यात आले होते. तसेच ऑक्टोबर महिन्यात नागरिकांनी पालिकेकडे केलेल्या तक्रारी नुसार 41 लाख 38 हजारांची रक्कम परत करण्यात आली आहे. तर पालिकेच्या विशेष लेखा पथकाकडे प्राप्त झालेल्या 812 देयकांपैकी 662 देयकांची प्राथमिक तपासणी करीत त्यातील 62 लाख 88 हजार 823 रुपये इतक्या रकमेचा परतावा रुग्णांना करण्यात येणार आहे (Navi Mumbai Private Hospitals returns 1 Crore extra bills to Corona Patients after MNS slams).
धन्यवाद @TV9Marathi https://t.co/EUwl9OuRaW
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) October 12, 2020
रुग्णांच्या मनपा कडे प्राप्त झालेल्या तक्रारी नुसार, तेरणा रुग्णालय (नेरुळ) 19 लाख 64 हजार, डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय (नेरुळ) 6 लाख 36 हजार, पीकेसी रुग्णालय 3 लाख 42 हजार 5, फोर्टिस रुग्णालय (वाशी) 2 लाख 50 हजार, अपोलो रुग्णालय (बेलापुर) 2 लाख 27 हजार, रिलायन्स रुग्णालय (कोपरखैरणे) 1 लाख 42 हजार, न्युरोजन रुग्णालय (सीवूडस) 1 लाख 37 हजार 429, फ्रोझान रुग्णालय 1 लाख 26 हजार, ग्लोबल हेल्थ केअर रुग्णालय 1 लाख 15 हजार 202, सिद्धीका हॉस्पिटल (कोपरखैरणे) 1 लाख 14 हजार, एमजीएम रुग्णालय (बेलापूर) 56 हजार 161, इंद्रावती रुग्णालय (ऐरोली) 29 हजार रक्कम नागरीकांना परत करण्यात आलेली आहे किंवा देयक रकमेतून परत करण्यात आलेली आहे. तर, विशेष पथकाच्या तपासणीनुसार वाढीव देयकामधून फॉर्टिझ रुग्णालय (वाशी) 17 लाख 86 हजार 425, फ्रोझॉन रुग्णालय (घणसोली) 14 लाख 41 हजार 335, सनशाईन रुग्णालय (नेरुळ) 12 लाख 32 हजार 272, एमपीसीटी रुग्णालय (सानपाडा) 10 लाख 90 हजार 940, एमजीएम रुग्णालय (वाशी) 7 लाख 37 हजार 851 रुपये परत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नवी मुंबईकरांच्या हक्काचे पैसे त्यांना परत मिळवून दिल्याचा आनंद असून या पूढे ही रुग्णांना आकारलेल्या प्रत्येक बिलामागील रक्कम परत मिळवून देत नाही तोपर्यंत हा लढा नवी मुंबई मनसेच्या वतीने सुरुच राहणार असल्याचे मत मनसे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केले आहे. तसेच संपूर्ण विषय गांभीर्याने घेऊन त्यांवर कारवाई केल्या बद्दल मनसेने मनपा आयु्क्त अभिजित बांगर यांचे आभार मानले आहेत.
हाे हे शक्य झालंय…!@mnsadhikrut @rajupatilmanase @SandeepDadarMNS @anilshidore pic.twitter.com/IlzuvnUcGh
— Gajanan Kale MNS (@GajananKaleMNS) October 12, 2020
Navi Mumbai Private Hospitals returns 1 Crore extra bills to Corona Patients after MNS slams
संबंधित बातम्या :
मनसेचा दणका, नवी मुंबईत खाजगी रुग्णालयांनी जादा आकारलेले 32 लाख रुपये रुग्णांना परत