नवी दिल्ली : पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये घुसून भारतीय वायूसेनेने शेकडो दहशतवाद्यांचा खात्मा केला. 14 फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले होते. अवघ्या 12 दिवसात भारताने याचा बदला घेतला. मंगळवारी पहाटे साडे तीन वाजता वायूसेनेने ही कारवाई केली. यानंतर सकाळी कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची बैठक झाली. यामध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी कारवाईबाबत माहिती दिली. या हल्ल्यात जैश ए मोहम्मदचे 25 टॉप कमांडर मारल्याचंही त्यांनी सांगितलं.
या एअर स्ट्राईकवर माजी क्रिकेटर आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंह सिद्धू यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. दहशतवाद्यांचा विनाश अनिवार्य आहे, भारतीय वायूसेनेचा विजय असो, असं ट्वीट सिद्धू यांनी केलंय. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानची बाजू घेतल्यामुळे सिद्धू यांनी ट्रोल करण्यात आलं होतं. त्यामुळे आता स्ट्राईकवर सिद्धू काय बोलतात याकडे लक्ष लागलं होतं.
सिद्धू यांनी ट्वीट केलं, “लोहा लोहे को काटता है, आग आग को काटती है, सांप जब डंक मारता है, उसका एंटीडोट विष ही है, आतंकियों का विनाश अनिवार्य है| भारतीय वायु सेना की जय हो, जय हिन्द जय हिन्द की सेना”
व्हिडीओ पाहा :