मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करताना ड्रग्जचा अँगल समोर आला (NCB investigate bollywood actress). त्यामुळे आता तपासाची चक्र पूर्णपणे फिरली. ड्रग्ज प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावं समोर आली आहेत आणि लवकरच आता बॉलिवूडमधील चार अभिनेत्रींना NCB कडून समन्स बजावलं जाणार आहे (NCB investigate bollywood actress).
या चार अभिनेत्रींमध्ये अभिनेता सैफ अली खानची मुलगी अभिनेत्री सारा अली खान, रकुल प्रीत सिंग, श्रद्धा कपूर आणि फॅशन डिझायनर सिमॉन खंबाटाचाही समावेश आहे. विशेष म्हणजे याआधी रिया चक्रवर्तीनं सारा, रकुल आणि सिमॉनची नावं घेतल्याचं समोर आलं होतं. मात्र आता या यादीत श्रद्धा कपूरचंही नाव आल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे आज (21 सप्टेंबर) सुशांतची माजी मॅनेजर श्रृती आणि जया शहा यांची चौकशी करण्यात आली आहे. आता सारा, रकुल, सिमॉन आणि श्रद्धा कपूरची चौकशी करण्यासाठी NCB समन्स बजावण्याच्या तयारीत आहे. हे समन्स बजवण्याचं आणखी एक कारण म्हणजे NCB च्या हाती लागलेल्या चॅटिंग आहे. ज्यामध्ये जया शहा, N नावाच्या अभिनेत्रीशी चॅटिंग करत आहे. मात्र ही N नावाची अभिनेत्री कोण आहे ?, याबद्दल NCB नं खुलासा केलेला नाही.
N- नावाची अभिनेत्री चॅटिंगवर जया शहाला म्हणतेय की, “तू मला प्रॉमिस केलं होतं की मला चांगलं एमडी ड्रग्ज मुंबईत देणार आणि आपण सोबत पार्टी करणार ?, मी पुन्हा येईल तेव्हा मला खरंच एका ब्रेकची गरज आहे”. यावर जया साहनं उत्तर दिलं, “कसं काय ?, तू तर मला ड्रग्ज पेडलर बनवत आहे. पण ठिक आहे, तुझी इच्छा माझ्यासाठी आदेश आहे”.
या व्यतिरिक्त आणखी एक चॅटिंगही NCB च्या हाती आलं आहे. ज्यामध्ये जया साह बोलतेय, “की जेव्हा तू खाली येणार मला कॉल कर. मी खाली येणार आणि तुला देईल”.
हॅलो. मी आज CBD ऑईल जिंदलसोबत पाठवतेय. त्यानंतर श्रद्धा नावाची तरुणी उत्तर देते, हे, धन्यवाद.
या चॅटिंगमधील श्रद्धाचं पुढचं नाव काय आहे, हे समजू शकलेलं नाही. तसेच N नावानं नंबर सेव्ह असलेल्या व्हॉट्सअॅपवरुन ड्रग्ज मागणारी अभिनेत्री किंवा तरुणी कोण आहे याची माहिती घेण्याचं काम टीव्ही 9 ची टीम करतेय. मात्र बॉलिवूडमध्ये ड्रग्ज रॅकेट किती खोलवर गेलं. हेही आता हळूहळू समोर येतं आहे. कारण सध्या तर सारा, रकुल, सिमॉन आणि श्रद्धा कपूरला समन्स बजावलं जाईल. मात्र अजूनही रियानं घेतलेली 21 नावं समोर यायची आहेत.
संबंधित बातम्या :
बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण : एकीकडे जामीनाची गडबड, दुसरीकडे आरोपींची धरपकड, NCB च्या गळाला बडा मासा