पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकाचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे (NCP corporator died due to Corona infection). दत्ता साने असं या नगरसेवकाचं नाव आहे. ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते देखील राहिले आहेत. 25 जून रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. तेव्हापासून त्यांच्यावर कोरोनावरील उपचार सुरु होते. मात्र, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. लॉकडाऊनच्या काळात गरजूंना धान्य वाटप करताना त्यांना कोरोना संसर्ग झाला होता.
पुण्यासह जिल्ह्यातील इतर भागात सातत्याने कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. नगरसेवक दत्ता साने यांना 25 जूनला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. सुरुवातीला त्यांना काही प्रमाणात कोरोनाची लक्षणं आढळली. मात्र, नंतर त्यांना श्वास घेण्यास त्रास सुरु झाला. त्यातच आज ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवरhttps://t.co/Ts5zdtNjBt#AjitPawar #Pune #CoronaUpdates @AjitPawarSpeaks @NCPspeaks
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2020
दरम्यान, पुणे जिल्ह्यात शुक्रवारी (3 जुलै) 1199 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली. यासह जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 26 हजार 143 वर पोहचली आहे. काल दिवसभरात उपचारानंतर बरे झालेल्या 792 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 16 हजार 156 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरात 16 बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आतापर्यंत झालेल्या मृत्यूंचा आकडा 822 वर पोहचला आहे.
पुणे मनपा हद्दीत शुक्रवारी दिवसभरात 807 नवीन बाधित रुग्ण आढळले. आतापर्यंत पुणे मनपा क्षेत्रात एकूण 19, 849 बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. काल दिवसभरात 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांची संख्या 685 एवढी झाली. काल 619 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत एकूण 12,290 जण कोरोनामुक्त झाले. सध्या पुण्यात 6874 सक्रिय रुग्ण आहेत, तर 389 गंभीर असून 59 व्हेंटिलेटर आहेत.
हेही वाचा :
पुण्यात कोरोनामुक्तीचा जल्लोष अंगलट, डीजे लावून नाचणाऱ्या 16 जणांवर गुन्हे दाखल
पुण्यात कोरोना आटोक्यात न आल्यास परिणाम भोगावे लागतील, अजित पवारांकडून अधिकारी धारेवर
वसई-विरार क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 220 रुग्ण
MLA Corona | अहमदनगरमधील काँग्रेस आमदाराला कोरोनाची लागण
संबंधित व्हिडीओ :