बीड : बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची (beed zp president and vice president election) निवडणूक 4 जानेवारी 2019 रोजी पार पडणार आहे. ही निवडणूक गुप्त पद्धतीने होणार आहे. दरम्यान, या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमधील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी (beed zp president and vice president election) उमेदवार निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची औरंगाबाद येथे शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा परिषद सदस्या शिवकन्या सिरसाठ यांचे नाव अध्यक्षपदासाठी तर नागरगावचे जिल्हा परिषद सदस्य जयसिंह सोळंके यांचे नाव उपाध्यक्षपदासाठी निश्चित करण्यात आले आहे. जयसिंह सोळंके हे आमदार प्रकाश सोळंके यांचे पुतणे आहेत.
राष्ट्रवादीचे जातीचे समीकरण
बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी राष्ट्रवादी जातीचे समीकरण वापरत असल्याचे समोर येत आहे. राष्ट्रवादी अध्यक्षपदासाठी ओबीसी समाजाच्या शिवकन्या सिरसाठ यांना तर उपाध्यक्षपदासाठी मराठा समाजाचे जयसिंह सोळंके यांना उमेदवारी देत आहे. ओबीसी आणि मराठा समाजाचे उमेदवार उभे केले तर चांगला प्रतिसाद मिळेल असे समीकरण ठेऊन राष्ट्रवादीने उमेदवार निश्चित केले आहेत.
बीड जिल्हा म्हटला म्हणजे भाजपचा बालेकिल्ला. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे बीडचे होते. त्यांच्यानंतर त्यांच्या कन्या पंकजा मुंडे पक्षासाठी काम करत आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडूनही या निवडणुकासाठी कसून प्रयत्न केले जात आहे. आमदार धनंजय मुंडे यासाठी कामाला लागले आहेत. बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या गोटात प्रचंड वेगाने हालचाली होत आहेत.