Neem Karoli Baba: 30 वर्षानंतर शेत खोदलं अन् सर्वांना धक्काच बसला; नीम करोली बाबांच्या रहस्यमयी गुंफेत काय सापडलं?

| Updated on: Jan 12, 2025 | 8:52 PM

जया प्रसाद पेंगुइन यांच्या "श्री सिद्धी मां" या पुस्तकात नीम करोली बाबाच्या 30 वर्षांनी सापडलेल्या गुफेचा उल्लेख आहे. गुफेतून येणारा दिव्य सुगंध आणि सापडलेले हवन सामग्रीचे अवशेष आश्चर्यकारक आहेत. गुफेचा शोध श्री सिद्धी मां यांनी एका वृद्धाच्या मदतीने लावला.

Neem Karoli Baba: 30 वर्षानंतर शेत खोदलं अन् सर्वांना धक्काच बसला; नीम करोली बाबांच्या रहस्यमयी गुंफेत काय सापडलं?
Neem Karoli Baba
Follow us on

नीम करोली बाबा हे 20व्या शतकातील महान संत होते. त्यांची ख्याती प्रचंड होती. आज ते शरीराने आपल्यात नाहीत, पण त्यांचा उपदेश जीवन कसं जगावं हे आजही शिकवतो. उत्तराखंडच्या कैची धाममध्ये बाबा नीम करोली यांचा आश्रम आहे. या ठिकाणी देशातूनच नव्हे तर विदेशातूनही भाविक येतात. बाबांच्या समाधीचं दर्शन घेतात. नीम करोली बाबा यांच्या आवतार कार्यावर डॉ. जया प्रसाद पेंगुइन यांनी एक पुस्तक लिहिलं आहे. ‘श्री सिद्धि मां’ असं या पुस्तकाचं नाव आहे. यात बाबांच्या आवतार कार्याचा आढावा घेतला आहे.

बाबांनी गावात अनेक वर्ष मुक्काम केला. त्यांनी जमिनीच्या खाली एका गुंफेत तप केला. तब्बल 30 वर्षानंतर एका शेताखाली नीम करोली बाबांची गुंफा सापडलीय. खरंतर अनेक वर्ष या गुंफेचा शोध घेण्यात येत होता. काही लोक तर अशी काही गुंफाच नाहीये. ही दंतकथा आहे, असं म्हणत होते. पण आता अचानक 30 वर्षानंतर ही गुंफा सापडली. विशेष म्हणजे निसर्गात एवढे बदल होऊनही ही गुंफा सुरक्षित आहे.

आणि सुगंध दरवळला

जेव्हा ही गुंफा उघडली तेव्हा इतक्या वर्षानंतरही गुंफेतील हवन सामग्रीचा दिव्य सुगंध येत होता, असा दावा जया प्रसाद यांनी या पुस्तकात केला आहे. तब्बल 30 वर्षानंतरही हा सुगंध कसा काय येऊ शकतो? याचंच सर्वांना आश्चर्य वाटलं. आम्ही थोडं पुढे जाऊन पाहिलं. थोडं बारकाईने पाहिलं तर ही गुंफा दोन भागात विभाजित झालेली दिसली. गुंफेच्या आतल्या भागात कोळशाचे काही तुकडे आणि विभूती दिसली. यावरून नीम करोली बाबा याच जागेवर बसून त्यांची साधना, तप करत होते हे स्पष्ट होत होतं. तसेच हवन करण्यासाठीचे लोखंडांचे दोन पात्र, मातीचे दोन गोळे आणि लोखंडाचे दोन चिमटेही सापडल्याचं या पुस्तकात म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

चिमटा देण्यास सांगितलं

या चिमट्यांवर बाबा लक्ष्मण दास असं लिहिलेलं होतं, असं पुस्तकात म्हटलं आहे. त्यानंतर लेखिकेने गावातील काही बुजुर्गांशी चर्चा केली. त्यातून त्यांना या चिमट्यांबाबतची माहिती मिळाली. नीम करोली बाबाने लक्ष्मण दास यांना हा चिमटा देऊन तो सुरक्षित ठेवण्यास सांगितलं होतं. त्यानंतर 1973मध्ये नीम करोली बाबांनी महासमाधी घेतली. मात्र, काही काळानंतर नीम करोली बाबा लक्ष्मण दास यांच्या स्वप्नात आले आणि एका वृद्ध मातेचा संकेत देऊन तिच्याकडे चिमटा द्यायला सांगितला. त्यानंतर लक्ष्मण दास यांनी तो चिमटा वृद्ध मातेला दिला. त्यानंतर हा चिमटा घेऊन ती वृद्धा कैची धामला आली होती, असा उल्लेखही या पुस्तकात आहे.

गुंफा कशी मिळाली?

नीम करोली बाबांच्या महासमाधीनंतर त्यांची शिष्या श्री सिद्धी मांने फारुखाबादच्या गावात जाण्याचा निर्णय घेतला. ज्या ठिकाणी बाबांनी तपश्चर्या केली ती गुंफा त्यांना पाहायची होती. या गावात गेल्यावर सिद्धी मांने गावातील लोकांशी चर्चा करून गुंफेच्याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पण 30 वर्ष निघून गेली होती. कुणालाही बाबांच्या गुंफेबाबत फार माहिती नव्हती. काही लोक एका शेताच्या दिशेने इशारा करत होते. पण एवढ्या वर्षात हे शेत अनेकदा नांगरले होते. या शेतात पिक तरारून आलं होतं.

मात्र, सिद्धी मांने या गावात एक दिवस राहण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्या शेतात गेल्या. त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने गावातील लोकही होते. प्रत्येकजण आपआपल्या पद्धतीने गुंफेच्याबाबत अंदाज वर्तवत होता. त्यावेळी अचानक एक वृद्ध सिद्धी मांच्या जवळ आला. तो म्हणाला, तुम्ही इकडे तिकडे काय शोधता? मां जिथे उभी आहे, तिथेच खोदा. मांच्या पायाखालीच गुंफा सापडेल. या बुजुर्ग व्यक्तीचं ऐकून गावकऱ्यांनी तिथेच खोदायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना जमीन भुसभुशीत लागली. अधिक खोदल्यानंतर त्यांना तिथे गुंफा सापडली, असं या पुस्तकात म्हटलंय.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )