रायपूर (छत्तीसगड) : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन (Chattisgadh twins baby) घोषित केला. याच दरम्यान छत्तीसगडमधील रायपूर येथे एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. विशेष म्हणजे या महिलेने जुळ्या मुलांची नावं कोरोना आणि कोविड अशी ठेवली आहेत. सध्या सर्वत्र या जुळ्या मुलांच्या नावाची जोरदार चर्चा (Chattisgadh twins baby) सुरु आहे.
छत्तीसगडमध्ये 27 मार्च रोजी डॉ. आंबेडकर रुग्णालयात एका महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला. लॉकडाऊन दरम्यान संपूर्ण देशात भीतीचे वातावरण असल्यामुळे या महिलेने आपल्या मुलांची नावं कोरोना आणि कोविड ठेवले आहेत. जेणकरुन लोकांच्या मनातील कोरोनाबद्दलची भीती निघून जाईल. विनय शर्मा यांच्या घरात जुळ्या मुलांचा जन्म झाल्याने सध्या त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण आहे.
“इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण देश बंद आहे. ट्रेनही बंद आहेत. प्रत्येकजण आपल्या घरात बसले आहेत. अशामध्ये मी जुळ्या मुलांना जन्म दिला आणि त्यांची नावं मी कोरोना आणि कोविड ठेवली आहेत. मला जुळी मुलं झाल्याचा खूप आनंद होत आहे. हा दिवस मी कधी विसरु शकत नाही”, असं जुळ्या मुलांची आई प्रितीने सांगितले.
नुकतेच मध्य प्रदेशातही एका मुलाचा लॉकडाऊन दरम्यान जन्मा झाला आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्या मुलाचे नाव लॉकडाऊन असं ठेवले आहे. तर काहीदिवसांपूर्वी लोकसभेत नागरिकता बिल पास झाल्यानंतर एका व्यक्तीने आपल्या नवी जन्म घेतलेल्या मुलीचे नाव नागरिकता ठेवले होते.
रायपूरमधील दोन रुग्णांनी कोरोनाला हरवले
रायपूरमधील रुग्णालयात दाखल असलेले दोन कोरोनाग्रस्त रुग्ण बरे झाले आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले आहे. दोघांना आता पुढील 28 दिवसांसाठी आयसोलेशमध्ये ठेवण्यात आले आहे. छत्तीसगडमध्ये आतापर्यंत सात कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.
दरम्यान, छत्तीसगड सरकार कोरोना विरोधात लढण्यासाठी पूर्णपणे तयारी करत आहे. राज्यात व्हेंटिलेटरची संख्या कमी असल्यामुळे खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटरचा वापर केला जाणार आहे. तसेच अॅम्बुलन्सची व्यवस्था केली जात आहे. त्यासोबत छत्तीसगडमध्ये 100 बेड असलेले रुग्णालय एका आठवड्यात तयार केले जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.
संबंधित बातम्या :