1 ऑगस्टपासून हे पाच नियम बदलणार, थेट तुमच्या खिशावर परिणाम
गॅस सिलेंडरचे दर, स्टेट बँकेचे नवे दर, ई-वाहनावरील जीएसटी परिषदेचा निर्णय, स्टेट बँकेचा आयएमपीएसवरील निर्णय या निर्णयांचा (Changes in August) यामध्ये समावेश आहे.
1 / 6
मुंबई : महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजे 1 ऑगस्टपासून देशात पाच नियमांमध्ये बदल (Changes in August) होईल. याचा परिणाम थेट दैनंदिन जीवनावर पडणार आहे, तर काही निर्णयांमुळे आर्थिक नुकसानही होणार आहे. गॅस सिलेंडरचे दर, स्टेट बँकेचे नवे दर, ई-वाहनावरील जीएसटी परिषदेचा निर्णय, स्टेट बँकेचा आयएमपीएसवरील निर्णय या निर्णयांचा (Changes in August) यामध्ये समावेश आहे.
2 / 6
3 / 6
27 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखालील जीएसटी परिषदेने ऑटो क्षेत्रासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला होता. ईलेक्ट्रॉनिक वाहनांवरील जीएसटी 12 टक्क्यांहून 5 टक्क्यांवर येणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक वाहनांच्या चार्जरवर लावण्यात येणाऱ्या करातही कपात करण्यात आली आहे. अगोदर 18 टक्के असणारा जीएसटी 5 टक्के करण्यात आलाय. हा नियम 1 ऑगस्टपासून लागू होईल.
4 / 6
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये फिक्स डिपॉझिट ठेवलेलं असेल तर 1 ऑगस्टपासून त्याचा मोबदला कमी मिळेल. एसबीआयने 179 दिवसांच्या जमा ठेवीवर व्याज दरात 0.5 ते 0.75 टक्क्यांनी कपात केली आहे. तर दीर्घ कालावधीच्या जमा ठेवीसाठी 0.20 टक्क्यांनी कपात करण्याचा निर्णय बँकेने घेतलाय.
5 / 6
एसबीआयने इंस्टंट मनी पेमेंट सर्व्हिंस म्हणजेच आयएमपीएसवर लागणारा चार्ज पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेतलाय. 1 ऑगस्टपासून आयएमपीएसवर कोणताही चार्ज लागणार नाही. यापूर्वी सर्व बँकांनी आरटीजीएस आणि एनईएफटीवर लागणारा चार्ज बंद केला होता.
6 / 6
प्रातिनिधिक फोटो