नवी दिल्ली: दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 19वा दिवस आहे. आज शेतकरी एक दिवसीय उपोषण करत आहेत. त्यांच्या या उपोषणाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पाठिंबा दिला आहे. गेल्या 2 आठवड्यापेक्षा जास्त कालावधीपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर IRCTC अर्थात रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिझम कॉर्पोरेशनकडून तब्बल 2 कोटी लोकांना एक ई-मेल पाठवण्यात आला आहे. (E-mail to 2 crore customers from IRCTC)
IRCTCकडून पाठवण्यात आलेल्या ई-मेलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने शिख समाजासाठी केलेल्या 13 कामांची माहिती देण्यात आली आहे. 8 ते 12 डिसेंबरदरम्यान हे ई-मेल पाठवण्यात आले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार IRCTCने आपल्या ग्राहकांना एक 47 पानी पुस्तिका पाठवली आहे. ‘पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचे शिख समाजाशी विशेष संबंध’ असं या पुस्तिकेचं नाव आहे. ही पुस्तिका केंद्र सरकारच्या जनसंपर्क विभागाकडून पाठवण्यात आली आहे. कायद्यांबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याबरोबरच त्यांच्या मनातील शंका दूर करणे हा या पुस्तिकेचा उद्देश आहे. ही पुस्तिका इंग्रजी, हिंदी आणि पंजाबी अशा तीन भाषांमध्ये आहे. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोदेखील आहे.
Got this mail from IRCTC ?#FarmersProtest pic.twitter.com/kybq0h5CWy
— Ishank Chauhan (@ishank_c) December 10, 2020
दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा ई-मेल पाठवण्यात आल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. यावर हा ई-मेल फक्त शिख समाजातील ग्राहकांनाच नाही तर सर्व समाजातील ग्राहकांना पाठवल्याचा दावा अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. यापूर्वीही लोककल्याण योजनांसाठी IRCTCकडून अशा पद्धतीनं पुढाकार घेण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.
This is not the first instance. Earlier also, such activities have been undertaken by IRCTC to promote government welfare schemes in the public interest: IRCTC https://t.co/MsP5OINoqP
— ANI (@ANI) December 14, 2020
IRCTCकडून पाठवण्यात आलेल्या पुस्तिकेत 1984 च्या दंगल पीडितांना दिला गेलेला न्याय, श्री हरमंदर साहिब, जालियनवाला बाग स्मारकाला FCRA कडून देण्यात आलेली मंजुरी, लंगरवर कर नसणे, करतारपूर कॉरिडॉरसह अनेक बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे. ही पुस्तिका गुरु नानक जयंतीला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि हरदीप सिंह पुरी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलं होतं.
संबंधित बातम्या:
Kisan Andolan : कृषी कायद्याविरोधात आंदोलन आणखी पेटणार, 1500 ट्रकसह 30,000 शेतकरी दिल्लीत धडकणार
दिल्ली बॉर्डरवर पोहोचले हजारो शेतकरी, आज मोठ्या आंदोलनाची शक्यता
E-mail to 2 crore customers from IRCTC