नवी दिल्ली: शेतकऱ्यांनी पुकारलेल्या मंगळवारच्या भारत बंदनंतर बुधवारी केंद्रानं पाठवलेला कायदा दुरुस्तीचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी धुडकावून लावला आहे. त्यानंतर आता आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे. पुढील आंदोलनाची रणनिती ठरवण्यासाठी आज सिंधू बॉर्डरवर दुपारी 2 वाजता शेतकरी संघटनांच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. (Meeting of farmers agitators on Sindhu border at 2 pm)
सिंधू बॉर्डरवर होणाऱ्या बैठकीत 40 शेतकरी संघटनांचे नेते सहभागी होणार आहे. या बैठकीत 12 आणि 14 डिसेंबरला केल्या जाणाऱ्या आंदोलनाची रणनिती ठरवण्यात येणार आहेत. दरम्यान, सरकारसोबत आज होणारी बैठकही रद्द करण्यात आली असून, पुढील चर्चेची तारिख अद्याप ठरलेली नाही.
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा आजचा 15 वा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. विविध राजकीय पक्षांसह नामवंत खेळाडू, कलाकार, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मात्र, हे आंदोलन कमकुवत करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप भारतीय किसान यूनियनचे नेते मंजित सिंह यांनी केलाय. पण देशभरातून हजारो शेतकरी या आंदोलनात सहभागी होण्यासाठी येत असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर दिल्लीतील जनतेकडे पाठिंबा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
Farmers’ protest against Farm Laws enters 15th day at Singhu border
“The govt intends to weaken the farmers’ movement but many more farmers are coming to Delhi to join the movement. We appeal to the people of Delhi to support us,” says Bharatiya Kisan Union’s Manjeet Singh pic.twitter.com/wZARSeIzvn
— ANI (@ANI) December 10, 2020
शेतकरी नेते प्रल्हाद सिंह यांनी 12 तारखेपासून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर 14 तारखेपर्यंत शेतकरी भाजप नेत्यांना, त्यांचे निवासस्थान आणि कार्यालयांना घेराव घालतील असंही सिंह यांनी सांगितलं. इतकच नाही तर भाजपच्या नेत्यांवर बहिष्कार घालण्याचा इशाराही देण्यात आला आहे. आता आम्ही मागे हटणार नाही. अनेक राज्यांतून शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. 12 तारखेपर्यंत ते दिल्लीला पोहोचतील. संपूर्ण दिल्लीला आम्ही घेराव घालू, असा इशाराही सिंह यांनी दिला आहे.
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी पंजाबी गायक सातत्यानं आंदोलनस्थळी पोहोचत आहेत. बुधवारी गायक एमी विक्रने सिंधू बॉर्डरवर जात गाणं गायलं. यापूर्वी दिलजीत दोसांज, परमिश वर्मा, निंजा यांसह अनेक कलाकार, गायक आंदोलनाचा भाग बनले आहेत.
#WATCH: Punjabi singer and actor Ammy Virk sings after addressing farmers protesting at Singhu border.
Today is the 14th day of the farmers’ protest against the farm laws at Singhu (Haryana-Delhi border). pic.twitter.com/4OAjWlFAqs
— ANI (@ANI) December 9, 2020
संबंधित बातम्या:
केंद्र सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला, काय म्हटलंय नव्या प्रस्तावात…?
शेतकरी आंदोलनाचा 15वा दिवस, प्रस्ताव फेटाळ्यानंतर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार
Meeting of farmers agitators on Sindhu border at 2 pm