टोलवसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तयारी

| Updated on: Apr 19, 2020 | 12:53 PM

'कोरोना' व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा 25 मार्च रोजी केली होती (NHAI to start Toll Collection on National Highways)

टोलवसुली मध्यरात्रीपासून पुन्हा सुरु होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची तयारी
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) उद्यापासून (सोमवार 20 एप्रिल) देशभरात पुन्हा टोलवसुली सुरु करणार आहे. तब्बल 25 दिवसांनंतर आज मध्यरात्रीपासून देशभरातील महामार्गांवर पुन्हा टोल आकारला जाणार आहे. (NHAI to start Toll Collection on National Highways)

‘कोरोना’ व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे आपत्कालीन सेवा सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावरील टोलवसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा 25 मार्च रोजी केली होती. परंतु लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरु असतानाही टोल आकारणी आधीच सुरु होत आहे.

‘सर्व ट्रक आणि इतर मालवाहू वाहनांच्या आंतरराज्य आणि राज्यांतर्गत वाहतुकीसाठी गृह मंत्रालयाने दिलेली शिथिलता लक्षात घेता, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गृह मंत्रालयाच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली पाहिजे आणि 20 एप्रिल 2020 पासून टोलवसुली पुन्हा सुरु करावी’ असे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने NHAI ला दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वाचा : ‘कोरोना’ संकटामुळे देशभरात टोलवसुली बंद, नितीन गडकरींकडून मोठा दिलासा

‘गृह मंत्रालयाने 20 एप्रिलपासून बऱ्याच प्रकारच्या वाहतुकीला परवानगी दिली आहे. यामध्ये व्यावसायिक आणि खाजगी आस्थापनांसह बांधकामास आवश्यक मालाच्या वाहतुकीचाही समावेश आहे.’ असा उल्लेख ‘NHAI’ ने 11 आणि 14 एप्रिलला पाठवलेल्या पत्रात केल्याचंही गृह मंत्रालयाने नमूद केलं आहे. या कारणांमुळे टोल वसुली पुन्हा सुरु करत असल्याचं गृह मंत्रालयाने स्पष्ट केलं. (NHAI to start Toll Collection on National Highways)

दरम्यान, ‘ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट कॉंग्रेस’ने या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘एकीकडे सरकारला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरु ठेवण्याची इच्छा आहे. आम्ही सर्व अडथळे पार करत, तोटा सहन करत राष्ट्रसेवा करत आहोत. त्यामुळे हा निर्णय दुर्दैवी आणि अयोग्य आहे.’ असं त्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, ई कॉमर्स कंपन्यांना फक्त जीवनवाश्यक वस्तूच घरपोच पाठवत येणार आहेत, इतर वस्तू डिलिव्हरी करण्यास मनाई कायम आहे