Nirmala Sitharaman | मजुरांना 2 महिने मोफत धान्य, कमी भाड्यात घर, फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी

| Updated on: May 14, 2020 | 5:41 PM

फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी, प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था, मजुरांना आणखी 2 महिने मोफत धान्य अशा महत्त्वाच्या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी केल्या.

Nirmala Sitharaman | मजुरांना 2 महिने मोफत धान्य, कमी भाड्यात घर, फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी
Follow us on

Union Finance Minister Nirmala Sitharaman : नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (FM Nirmala Sitharaman PC) यांनी 20 लाख कोटी रुपयाचं ‘स्वावलंबी भारत अभियान’ पॅकेज जाहीर केलं. त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज दुसरी पत्रकार परिषद घेत या पॅकेजची सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी गरीब, शेतकरी, मजुरांसाठी 9 मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटी, प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था, मजुरांना आणखी 2 महिने मोफत धान्य (FM Nirmala Sitharaman PC) अशा महत्त्वाच्या घोषणा केल्या.

त्याशिवाय, अर्थमंत्र्यांनी ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ची घोषणा केली. “रेशन कार्डाची पोर्टेबिलीटी करणार, या माध्यमातून गोरगरीब जनता देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या वाट्याचे धान्य घेऊ शकतील”, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. तसेच, “फेरीवाल्यांसाठी केंद्र सरकार 5 हजार कोटींची मदत करणार आहे. महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना अंमलात आणली जाईल”, असंही अर्थमंत्र्यांनी सांगितलं.

FM Nirmala Sitharaman LIVE Updates 

  • किसान क्रेडीट कार्ड अंतर्गत 2 लाख कोटीचे कर्ज, 2.5 कोटी शेतकऱ्यांना लाभ, मच्छीमार, दुधव्यावसायिकांनाही सवलतीत कर्ज : अर्थमंत्री
  • ग्रामीण सहकारी बँकांच्या पीक कर्जासाठी नाबार्डकडून 30 हजार कोटींचे अतिरीक्त सहाय्य, आणीबाणीची स्थिती म्हणून तातडीने सहाय्य : अर्थमंत्री
  • सहा ते अठरा लाख वार्षिक उत्पन्न असलेल्या मध्यम उत्पन्न गटासाठी 70 हजार कोटींचे प्रोत्साहन, परवडणाऱ्या गृह योजनेचा मध्यमवर्ग आणि मजूर अशा दोन्ही घटकांना लाभ : अर्थमंत्री
  • परवडणा-या घरांसाठी मुदतवाढ, मार्च 20 ऐवजी मार्च 21 पर्यंत घरे घेता येणार, मध्यम उत्पन्न वर्गासाठी गृहखरेदीसाठी सवलत, 6-18 लाख उत्पन्न गटाच्या योजनेस मुदतवाढ, 2.5 लाख नवी कुटुंबे लाभ घेऊ शकतील : अर्थमंत्री
  • फेरीवाल्यांसाठी 5 हजार कोटींची मदत करणार, महिन्याभरात फेरीवाल्यांसाठी खास योजना, 50 लाख फेरीवाल्यांना 5 हजार कोटींचे कर्जवाटप करु, प्रत्येकी 10 हजार रुपयांपर्यंतचे कर्जवाटप : अर्थमंत्री
  • 50 लाख फिरत्या विक्रेत्यांना (फेरीवाले) पाच हजार कोटी रुपयांची सुविधा, प्रतीव्यक्ती दहा हजार रुपये मिळणार, एक महिन्यात योजना, डिजिटल पेमेंट केल्यास अधिक लाभ : अर्थमंत्री
  • मुद्रा शिशू लोन धारकांसाठी 1500 कोटींची मदत, मुद्रा शिशू लोन अंतर्गत 50 हजारांपर्यंतचे कर्ज, मुद्रा शिशू लोनवर 2% व्याजमाफी, 1 लाख 62 हजार कोटींचे कर्जवाटप, 3 कोटी मुद्रा शिशू लोनधारकांना लाभ मिळेल : अर्थमंत्री
  • पीएम आवास योजना मजुरांनाही लागू होणार, शहरी गरिबांबरोबर मजुरांनाही पीएम आवास योजना, परवडेल अशी भाड्याची घरे उपलब्ध करु देणार : अर्थमंत्री
  • प्रवासी मजुरांना कमी किमतीत राहण्याची व्यवस्था व्हावी, उद्योगपती आणि राज्य सरकारांना प्रोत्साहन भत्ता देणार : अर्थमंत्री
  • रेशन कार्डाचीही पोर्टेबिलीटी करणार, देशात कुठल्याही दुकानात रेशन घेता येणार, वन नेशन-वन रेशन कार्ड लागू करणार : अर्थमंत्री
  • सर्व मजुरांना अजून 2 महिने मोफत अन्नधान्य देणार, 5 किलो गहू, 5 किलो तांदूळ, 1 किलो चना डाळ 8 कोटी मजुरांना देणार, यासाठी 3500 कोटी देणार : अर्थमंत्री
  • वन नेशन वन रेशन कार्ड, देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात आपल्या वाट्याचे धान्य गरीब घेऊ शकणार : अर्थमंत्री
  • पुढील दोन महिने स्थलांतरित मजुरांना मोफत धान्य; 8 कोटी मजुरांना लाभ, कार्ड नसल्यासही प्रत्येक व्यक्तीला 5 किलो गहू किंवा तांदूळ आणि प्रत्येक कुटुंबाला एक किलो चणाडाळ, राज्य सरकारकडे जबाबदारी: अर्थमंत्री
  • वेगवेगळ्या राज्यांमधील मजुरांच्या वेतनातील क्षेत्रीय असमानता काढून टाकली पाहिजे : अर्थमंत्री
  • स्थलांतरित मजूर आणि इतरांची काळजी घेण्यासाठी राज्यांना 11,000 कोटी रुपये दिले : अर्थमंत्री
  • 2.33 कोटी मजुरांना मनरेगाचे काम, 40 ते 50% मजुरांकडून नोंदणी, गावी गेल्यावरही मजुरांनी नोंदणी करावी, मजुरांना रोज 182 ऐवजी 202 रु. रोजगार मिळेल : अर्थमंत्री
  • आज 9 योजनांचा समावेश :
    – 3 स्थलांतरित कामगारांसाठी
    – 1 फेरीवाल्यांसाठी
    – 1 छोटे व्यापाऱ्यासाठी
    – 1 स्वयंरोजगार
    – 2 लहान शेतकऱ्यासाठी
    – 1 गृहनिर्माण
  • 12 हजार स्वयंसहायता गटांनी 3 कोटी मास्क बनवले, 7200 स्वयंसहायता गट शहरी भागात स्थापना केले : अर्थमंत्री
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचे निर्णय, ग्रामीण बँकांकडून 29 हजार 500 कोटींचं कर्ज, मार्च, एप्रिलमध्ये 63 लाख कर्जाना मंजुरी : अर्थमंत्री
  • कोरोना काळात शहरी भागातील निवारागृहात राहणाऱ्या गरीब बेघरांना तीन वेळचे जेवण : अर्थमंत्री
  • सवलतीच्या कर्जाच्या परतफेडीची मुदत वाढवली, 31 मार्चऐवजी 31 मेपर्यंत कर्जफेड करता येणार, 25 लाख नवीन किसान क्रेडीट कार्ड दिली, लॉकडाऊनमध्ये 25 हजार कोटी रुपयांचे कर्जवाटप : अर्थमंत्री
  • 3 कोटी शेतकऱ्यांना यापूर्वीच सवलतीचे कर्ज, 3 कोटी शेतकऱ्यांना 4 लाख कोटी कर्जवाटप, सवलतीच्या कर्जाची परतफेडीची मुदत वाढवली, 31 मार्च ऐवजी 31 मे पर्यंत कर्जफेड करता येणार, 25 लाख नवीन किसान क्रेडीट कार्ड देणार – अर्थमंत्री
  • स्थलांतरित मजूर, शेतकरी, फेरीवाल्यांसाठी विशेष पॅकेज – अर्थमंत्री
  • स्थलांतरित मजूर, फेरीवाले, व्यावसायिक, लघु शेतकरी यांच्यासाठी आज घोषणा करणार : अर्थमंत्री

FM Nirmala Sitharaman PC

20 लाख कोटी रुपयांचं पॅकेज

कोरोना संकंटाचा सामना करताना नव्या संकल्पानुसार पंतप्रधान मोदी यांनी विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली. हे आर्थिक पॅकेज स्वावलंबी भारताचा संकल्प साकार करण्यात महत्त्वाची भूमिका निभावेल. हे पॅकेज 20 लाख कोटी रुपयांचं असेल, असे मोदींनी सांगितलं.

नुकतंच सरकारने कोरोना संकंटाशी संबंधित ज्या आर्थिक घोषणा केल्या होत्या. जे रिझर्व्ह बँकेचे निर्णय होते आणि आज ज्या आर्थिक पॅकेजची घोषणा होत आहे त्याला जोडलं तर हे पॅकेज जवळपास 20 लाख कोटींचं पॅकेज आहे. हे पॅकेज भारताच्या जीडीपीचं जवळपास 10 टक्के एवढे आहे. देशाच्या विविध वर्गांना यामार्फत आर्थिक सहकार्य मिळेल. 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये स्वावलंबी भारतच्या अभियानाला एक वेगळी गती देईल. स्वावलंबी भारतच्या संकल्पाला सिद्ध करण्यासाठी या पॅकेजमध्ये सगळ्या गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. हे पॅकेज कुटीर उद्योग, गृह उद्योग, लघु उद्योग अशा अनेकांसाठी आहे.

देशातील नागरिकांसाठी दिवसरात्र झटणाऱ्या शेतकरी आणि श्रमिक मजुरांसाठी हे आर्थिक पॅकेज आहे. हे आर्थिक पॅकेज प्रामाणिकपणे टॅक्स भरुन देशाच्या विकासात आपलं योगदान देणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी आहे. गेल्या सहा महिन्यात व्यवस्था सक्षम झाली. त्यामुळेच भारताच्या प्रत्येक गरिबापर्यंत केंद्र सरकारची आर्थिक मदत पोहोचली.

FM Nirmala Sitharaman PC

 

संबंधित बातम्या :

Aatm Nirbhar Bharat : 20 लाख कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये कुठल्या क्षेत्राला काय मिळणार?

Economic Package | सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटींचे विना हमी कर्ज, गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ

15 हजारांपेक्षा कमी पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना आणखी 3 महिने ईपीएफ सहाय्य, मोदी सरकारचा दिलासा