रायगड : निसर्ग चक्रीवादळ 3 जून रोजी कोकण समुद्र किनारपट्टीवर धडकणार (Nisarga Cyclone Raigad) आहे. उद्या (3 जून) सकाळी 5.30 वाजता वादळाचा जोर जास्त राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 100 ते 125 ताशी वाऱ्याचा वेग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे वादळी पाऊस पडणार आहे. या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती निर्माण होऊन मोठी हानी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या वादळाची झळ अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, उरण समुद्रकिनाऱ्यावरील 62 गावांना बसणार (Nisarga Cyclone Raigad) आहे.
या गावांची लोकसंख्या 1 लाख 77 हजार आहे. या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी एनडीआरएफ टीम अलिबाग, श्रीवर्धन तालुक्यात दाखल झाली आहे. या टीममध्ये एकूण 22 जवान आहेत. तर उरण नागरी संरक्षण दल आणि मुरुडमध्ये कोस्टगार्ड तैनात ठेवण्यात आले आहेत.
या सर्व टीम सध्या परिसराची पाहणी करणार आहे. घरात राहणाऱ्या नागरिकांचे शाळा, समाज मंदिर, अंगणवाडी तसेच इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येत आहे. वादळानंतर मोठ्या आकाराचे वृक्ष तोडण्यासाठी लागणारी सर्व मशिनरी, इमर्जन्सी बोट, कटर, रोप अशा सर्व सामग्री तयार करण्यात आली आहे.
‘निसर्ग’ चक्रीवादळाची थोडक्यात माहिती
चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
1. प्रथमोपचार पेटी तयार ठेवा, औषध गोळ्या असू द्या
2. पाणी उकळूनच प्या, थंड पाणी टाळा
3. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं बंद करा, गॅसही बंद ठेवा
4. दारं, खिडक्या बंद ठेवा
5. घराचं काम पूर्ण करा, टोकदार गोष्टी बांधून ठेवा
6. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा
7. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा
8. जर तुमचं घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा
(Preparedness for Nisarga Cyclone by Maharashtra Government)
9. मोडकळीस आलेल्या इमारती किंवा घरात जाऊ नका
10. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा
11. समुद्रात किंवा किनारी जाऊ नका
12. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा
13. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा
14. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका
15. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या
संबंधित बातम्या :
Cyclone Nisarga | चक्रीवादळात सुरक्षित राहण्याचे 15 मंत्र
शंभर वर्षात पहिल्यांदाच मुंबईत चक्रीवादळाची शक्यता, काय आहे निसर्ग चक्रीवादळ?
Cyclone Nisarga live : निसर्ग चक्रीवादळ, NDRF ची पथकं तैनात, समुद्र किनारी वादळापूर्वीची शांतता
चक्रीवादळाचा संभाव्य धोका, मुंबईकरांसाठी महापालिकेच्या महत्त्वाच्या सूचना