दुसऱ्यांदा मंत्री होण्याआधीच गडकरींचा शेतकऱ्यांसाठी मेगा प्लॅन तयार

| Updated on: May 29, 2019 | 8:53 PM

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच त्यांच्या नवनवीन प्रयोगांमुळे चर्चेत असतात. आता असाच एक प्रयोग त्यांनी करण्याचा निर्धार केलाय. शेती उत्पन्नापासून तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन क्रूड ऑईलने विदर्भासह संपूर्ण देश समृद्ध करणार, असा निर्धार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यात ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाऊंडेशनची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं. वाढदिवसानिमित्त ग्रीन क्रूड अँड […]

दुसऱ्यांदा मंत्री होण्याआधीच गडकरींचा शेतकऱ्यांसाठी मेगा प्लॅन तयार
Follow us on

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच त्यांच्या नवनवीन प्रयोगांमुळे चर्चेत असतात. आता असाच एक प्रयोग त्यांनी करण्याचा निर्धार केलाय. शेती उत्पन्नापासून तयार करण्यात येणाऱ्या ग्रीन क्रूड ऑईलने विदर्भासह संपूर्ण देश समृद्ध करणार, असा निर्धार नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. यात ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाऊंडेशनची भूमिका महत्त्वाची असल्याचंही त्यांनी सांगितलं.

वाढदिवसानिमित्त ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाऊंडेशनचे अध्यक्ष संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव अजित पारसे यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली, याच वेळी शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी ग्रीन क्रूड ऑईलने मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पदाधिकाऱ्यांसोबत गडकरी यांनी जैवइंधन, इथेनॉल निर्मितीतून शेतकऱ्यांना होणारा फायदा, थेट उद्योगाशी शेतकऱ्यांना जोडणे, उद्योग किंवा रिफायनरी उभी करणे, रोजगार निर्मिती, आयात केलेले कच्चे तेलावरील खर्च यावर चर्चा केली. कृषी मालाला योग्य दर न मिळाल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यावर उपाय म्हणून कृषी मालाचा उपयोग इथेनॉल, जैवइंधन निर्मितीसाठी केल्यास देशातील शेतकरी समृद्ध होईल, असं गडकरी म्हणाले.

चार महिन्यांपूर्वी नितीन गडकरी यांनी लोकार्पण केलेल्या ‘इंडिया फॉर इथेनॉल’ या ‘वेब पोर्टल’वर आतापर्यंत 80 लाखांवर नागरिकांनी भेट दिली. यातील 54 टक्के नागरिक ग्रामीण भागातील किंवा शेतकरी आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्याच भागात जैवइंधननिर्मिती प्रकल्प स्थापन करून रोजगार मिळवून देणे, उद्योग सहाय्यता प्रकल्प राबविणे, शेतकऱ्यांना जैवइंधनाबाबत सोशल मीडिया, इंटरनेट, संगणकाद्वारे सादरीकरणातून संपूर्ण माहिती देण्याचं काम ग्रीन क्रूड अँड बायोफ्यूएल फाऊंडेशन करत आहे.