अहमदनगर : सम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगा होतो, तर विषम तारखेला संबंध ठेवल्यास मुलगी होतो, असं वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी अखेर कायदेशीर नोटीसला उत्तर दिलं आहे (Indorikar Maharaj reply to PCPNDT Notice). लिंग भेदभाव करणाऱ्या या वक्तव्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने इंदोरीकर महाराजांना पीसीपीएनडीटी कायद्यानुसार नोटीस बजावत स्पष्टीकरण मागितलं होतं. यावर दिलेल्या कालावधीच्या अखेरच्या दिवशी इंदोरीकरांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर देत खुलासा केला. विशेष म्हणजे यावेळी माध्यमांना याचं चित्रिकरण करण्यास देखील मज्जाव करण्यात आला.
इंदोरीकर महाराज यांचे वकील अॅड. शिवडीकर अखेरच्या दिवशी दुपारच्या सुमारास अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी इंदोरीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपलं स्पष्टीकरण सादर केलं. यात इंदोरीकरांनी नेमकी काय भूमिका घेतली आणि काय स्पष्टीकरण दिलं ते अद्याप समजू शकलेलं नाही. विशेष म्हणजे शिवडीकर यांनी यावेळी माध्यमांपासून लांब राहणंच पसंत केलं. त्यांनी गुपचूप खुलासा सादर करुन पळ काढला.
इंदोरीकर महाराज नेमकं काय म्हणाले होते?
इंदोरीकर महाराजांनी आपल्या एका कीर्तनात मुलगा होण्यासाठी आणि मुलगी होण्यासाठी ठराविक दिवशी शारीरिक संबंध ठेवण्याबाबत वक्तव्य केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. या व्हिडीओत इंदोरीकर म्हणाले, “स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग अशीव वेळी झाला तर होणारी संतती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत घालणारी होते.”
संबंधित बातम्या
माझे सध्या वाईट दिवस, चांगलं काम करताना एवढा त्रास होतो : इंदुरीकर महाराज
राज्य सरकारच्या अकलेची कीव, भाजप आमदाराचा इंदुरीकर महाराजांना पाठिंबा
आमचं घरच बसल्यासारखं झालं, मुलं शाळेत जाईनात, आख्खं घर आऊट झालं, इंदुरीकर महाराज उद्विग्न
आता आपली कपॅसिटी संपली, उद्या-परवाचं बघून फेटा ठेवणार, शेती करणार : इंदुरीकर महाराज
वादानंतर इंदोरीकर महाराजांचं समर्थकांना नम्र आवाहन
संबंधित व्हिडीओ: