नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच आरोग्य सुविधांच्या कमतरतेचाही प्रश्न समोर येत आहे. नागपूरमधील बुटीबोरीमध्ये एका कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी तब्बल 20 तास ताटकाळत वाट पाहावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (No Ambulance for corona patient in Nagpur). यावर बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत फक्त मुंबईकडे लक्ष न देता आमच्याकडेही लक्ष द्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केलं.
नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी बुटीबोरीच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ‘कोरोना रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका कोरोना रुग्णाला तब्बल 20 तास घरीच वाट पाहावी लागली. यावेळी हा रुग्ण आपल्या कुटुंबासोबत होता. आम्हीही महाराष्ट्राचे नागरिक आहोत. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी फक्त मुंबईकडे लक्ष न देता आमच्याकडेही लक्ष द्यावं,’ असं संतप्त मत बबलू गौतम यांनी व्यक्त केलं.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
बबलू गौतम म्हणाले, “ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, पण प्रशासनाकडून पुरेशा सोई सुविधा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फक्त मुंबईकडे लक्ष न देता आमच्याकडेही लक्ष द्यावं. आम्हीही महाराष्ट्राचेच नागरिक आहोत.” बुटीबोरी शहराला लागूनच आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी आहे. शिवाय ही मोठी बाजारपेठ असल्यानं लोकांची येजा जास्त आहे. त्यामुळे बुटीबोरीत क्वॉरंटाईन सेंटर उभारण्याची मागणीही यावेळी बबलू गौतम यांनी केली.
दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गुरुवारी (23 जुलै) 172 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यापैकी नागपूर ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, तर शहरात 100 नव्या रुग्णांची नोंद झाली. जुलै महिन्याच्या 23 दिवसांमध्येच नागपूर जिल्ह्यात तब्बल 1960 कोरोना रुग्ण वाढले आहेत.
कामठीत 40 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह आता नागपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 3465 वर पोहचली आहे. गुरुवारी 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यासह आता नागपूरमधील एकूण कोरोना बळीची संख्या 65 वर पोहचली आहे. नागपुरात उपचारानंतर बरे झाल्याने काल 100 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 2213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
हेही वाचा :
Pune Lockdown | पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या निर्बंधांसह नवे नियम जाहीर
‘नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार’, पुण्यात युवक काँग्रेसची बॅनरबाजी
पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनोखा उपक्रम
No Ambulance for corona patient in Nagpur