फळांचा रस लहान मुलांसाठी घातक : तज्ज्ञ

| Updated on: Aug 27, 2019 | 2:05 PM

नवजात बाळ आणि लहान मुलांना फळांचा रस देणे हे त्यांच्या शरीराला घातक ठरु शकते असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. लहान मुलांना फळांचा रस देण्यापेक्षा हंगामी फळ खायला द्या.

फळांचा रस लहान मुलांसाठी घातक : तज्ज्ञ
Follow us on

नवी दिल्ली : फास्ट फूडपेक्षा फळांचा रस (Fruit Juices) हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला मानला जातो. त्यामुळे सध्या धावपळीच्या युगात स्वत:ला फीट ठेवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारच्या फळांचा ज्यूस पितात. यामुळे शरीराला योग्य ती पोषक तत्वे मिळतात. त्यासोबतच शरीरातील पाण्याची कमतरताही यामुळे भरुन निघते. पण नवजात बाळ आणि लहान मुलांना फळांचा रस देणे हे त्यांच्या शरीराला घातक ठरु शकते असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. लहान मुलांना फळांचा रस देण्यापेक्षा हंगामी फळ खायला द्या. फळ खाल्ल्याने लहान मुलांचे आरोग्य सुधारेल असेही तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.

आयडीयल अॅकेडमी ऑफ पिडीयाट्रिक्स (आईएपी) (Ideal academy of pediatrics) यांनी न्यूट्रिशन अध्यायतंर्गत बनवलेल्या एका राष्ट्रीय सल्लागारांनी यांनी फास्ट फूड, शीतपेय आणि एनर्जी ड्रिंक्स बाबतचे निर्देश जारी केले आहेत. या निर्देशानुसार, नवजात बाळ आणि लहान मुलांना फळांचा रस देण्यापेक्षा हंगामी फळ खायला द्या असे तज्ज्ञांनी सांगितले

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर 2 वर्षांपासून 5 वर्षापर्यंतची मुलांना फळांचा रस देत असाल, तर त्याचे प्रमाण दर दिवशी 125 मिली असावे. तसंच जर 5 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या मुलांना जर तुम्ही फळांचा रस देत असाल, तर तो एक कप म्हणजेच दर दिवशी 250 मिली असावे.

लहान मुलांना एका ठराविक प्रमाणात ताजा फळांचा रस द्यावा. हवाबंद किंवा ताज्या फळांच्या रसात साखर आणि कॅलरीचे प्रमाण अधिक असते. त्या तुलनेत फळ हे मांसपेशी विकसित करण्यास मदत करतात अशी माहिती राम मनोहर लोहिया रुग्णालयाच्या ज्येष्ठ बालरोगचिकित्सक डॉ हेमा गुप्ता यांनी दिली.

फळांमध्ये साखरेसोबतच फायबरही असते, त्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास मदत होते. मात्र फळांच्या रसात साखरेचे प्रमाण जास्त असल्याने याचा शरीराला धोका निर्माण होतो.

आईएपीने दिलेल्या निर्देशानुसार, 5 वर्षाखालील मुलांना कार्बोनेटेड पेय, चहा, कॉफी यासारखे कॅफेन युक्त पेय यापासून दूर ठेवले पाहिजे. तर 5 ते 9 वर्षांपर्यंत शाळेत जाणाऱ्या मुलांचे चहा आणि कॉफीचे प्रमाण हे अर्धा कप ठेवले पाहिजेत. तसेच 10 ते 18 वर्षापर्यंतच्या मुलांना दिवसाला 1 कप चहा किंवा कॉफी प्यायला हवी.

खाद्य किंवा पेय पदार्थांचा थेट संबंध हा शरीरातील मासपेशींशी होतो. त्यामुळे लहान मुलांना हृदयाशी संबंधित आजार होऊ शकतात. तसेच कॅफेनयुक्त पेय प्यायल्याने लहान मुलांच्या झोपेवर परिणाम होतो असेही आईएपीने निर्देश दिले आहेत.