मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना लढ्याबाबत कडक पावलं (Ajit Pawar warns irresponsible people) उचलण्याचा इशारा दिला आहे. “इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा घ्यावा; कोरोना लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची खैर करणार नाही”, असं अजित पवार म्हणाले. गर्दी कमी होत नसल्याने, सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिक कठोर पावले उचलणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. (Ajit Pawar warns irresponsible people)
लोक भाजी खरेदीसाठी गर्दी करत आहेत. मात्र त्यामुळे कोरोना अटोक्यात येणार नाही. इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असं अजित पवार म्हणाले.
इतकंच नाही तर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजी खरेदीसाठी उसळणारी गर्दी चिंताजनक आहे. कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आला आहे, मात्र या गर्दीमुळे लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आल्याचं अजित पवार म्हणाले.
बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला.
महाराष्ट्रात स्थिती काय?
महाराष्ट्रातील ‘कोरोना’बाधितांची संख्या 320 वर पोहोचली आहे. तर मुंबईतील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 167 वर गेला आहे. ‘कोरोना’मुळे महाराष्ट्रात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांचा आकडा 12 वर पोहोचलेला आहे. मुंबईतच आठ बळी गेले आहेत. (India Corona Patients Increase)
भारतात कोरोनाचा वाढता आकडा
भारतात गेल्या 16 दिवसांमध्ये ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये 16 पट वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. 16 दिवसात देशातील ‘कोरोनाग्रस्तां’चा आकडा 1600 च्या उंबरठ्यावर आहे. मंगळवार 31 मार्चला एका दिवसातच तब्बल 315 नवे रुग्ण आढळले. (India Corona Patients Increase)
एक मार्चपर्यंत भारतात केवळ तीन कोरोनाबाधित होते, तर 15 मार्चला हा आकडा 98 वर पोहोचला होता. म्हणजेच ही संख्या शंभरच्या आत होती. परंतु 31 मार्चला देशातील ‘कोरोनाग्रस्तां’ची संख्या 1618 वर गेली आहे. भारतात ‘कोरोना’च्या प्रसाराचा वेग या आकडेवारीवरुन लक्षात येत आहे.
जिल्हा | रुग्ण | बरे | मृत्यू |
---|---|---|---|
मुंबई | 343962 | 318995 | 11535 |
पुणे | 439562 | 405696 | 8144 |
ठाणे | 293052 | 274816 | 5873 |
पालघर | 49872 | 47852 | 939 |
रायगड | 72974 | 69761 | 1613 |
रत्नागिरी | 12336 | 11646 | 425 |
सिंधुदुर्ग | 6777 | 6359 | 180 |
सातारा | 60722 | 57120 | 1858 |
सांगली | 51829 | 49294 | 1800 |
नाशिक | 137449 | 128167 | 2093 |
अहमदनगर | 79880 | 76380 | 1171 |
धुळे | 18870 | 16902 | 337 |
जळगाव | 69604 | 63098 | 1542 |
नंदूरबार | 11448 | 10157 | 229 |
सोलापूर | 59754 | 56379 | 1859 |
कोल्हापूर | 50144 | 48056 | 1684 |
औरंगाबाद | 59429 | 50987 | 1289 |
जालना | 16713 | 15779 | 394 |
हिंगोली | 5342 | 4497 | 100 |
परभणी | 9332 | 7943 | 313 |
लातूर | 26927 | 25245 | 716 |
उस्मानाबाद | 18533 | 17413 | 576 |
बीड | 20796 | 18513 | 577 |
नांदेड | 26170 | 22710 | 692 |
अकोला | 20302 | 16111 | 404 |
अमरावती | 43318 | 38752 | 567 |
यवतमाळ | 21989 | 18875 | 497 |
बुलडाणा | 20865 | 17605 | 270 |
वाशिम | 11352 | 10120 | 169 |
नागपूर | 173547 | 152959 | 3584 |
वर्धा | 16143 | 14254 | 325 |
भंडारा | 14604 | 13711 | 315 |
गोंदिया | 14858 | 14440 | 175 |
चंद्रपूर | 25987 | 24485 | 422 |
गडचिरोली | 9325 | 8994 | 103 |
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु) | 146 | 0 | 91 |
एकूण | 2314413 | 2134072 | 52861 |
संबंधित बातम्या
देशात ‘कोरोना’चे रुग्ण 16 दिवसात 16 पट, बारा तासात 240 कोरोनाग्रस्तांची वाढ
जवळपास 19 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा : अजित पवार
कोल्हापूरकरांची नेटकी तयारी, शिवाजी विद्यापीठाचं रुपांतर रुग्णालयात करण्यासाठी चाचपणी