No Shave November| तरुणाईचा नवा ट्रेंड, सोशल मीडियावरच्या ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेला सामाजिक बांधिलकीची जोड!

| Updated on: Nov 01, 2020 | 1:34 PM

वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून, ती एक सामाजिक मोहीम देखील आहे.

No Shave November| तरुणाईचा नवा ट्रेंड, सोशल मीडियावरच्या ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेला सामाजिक बांधिलकीची जोड!
Follow us on

मुंबई : परदेशाप्रमाणे आपल्या देशामध्येही नोव्हेंबर महिन्यामध्ये दाढी न करण्याचा अर्थात ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा ट्रेंड (No shave November trend) वाढताना दिसत आहे. भारतामध्ये समाज माध्यमांचा वापर मागील काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात वाढला आहे. त्यामुळेच परदेशातील अनेक कल्पना या समाज माध्यमांवरून व्हायरल होऊन आपल्याकडे येतात. या कल्पना येथे रुजतात आणि वाढतात. इंटरनेटमुळे अशा अनेक कल्पनांची देवणघेवणा अगदी सहज होताना दिसत आहे. मागील काही वर्षांपासून सात्यत्याने अशीच वाढत गेलेली संकल्पना म्हणजे ‘नो शेव्ह नोव्हेंबर’. या मोहिमेशी अनेक सामाजिक कार्यांची जोड देऊन भारतातही ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ साजरा होताना दिसतोय.(No shave November Trending On Social media)

सामान्यपणे आपल्याकडे समाज माध्यमांवर एखादी गोष्ट व्हायरल झाली की, तो ट्रेंड फॉलो केला जातो. मात्र, त्यामागील मूळ उद्देश काय आहे, हे खूपच कमी जणांना ठाऊक असते. वास्तविक ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ हा फक्त एक व्हायरल ट्रेंड नसून, ती एक सामाजिक मोहीम देखील आहे. परदेशात मागील अनेक वर्षांपासून ही मोहीम सुरू आहे. पुरुषांचे आरोग्य आणि खास करून प्रोस्टेट कॅन्सरबद्दल जगरूकता निर्माण करण्याच्या हेतूने ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ साजरा केला जातो.

‘नो शेव्ह नोव्हेंबर’ची सुरुवात..

खरे तर 1999मध्ये ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही मोहीम सर्वात अगोदर ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न शहरात काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली होती. दरवर्षी जगभरात ‘वर्ल्ड बिअर्ड अँड मुस्टॅश कॉम्पिटिशन’ ही स्पर्धा घेतली जाते. त्यातूनच ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ ही संकल्पना पुन्हा एकदा पुढे आली आहे. जगभरातले ‘दाढीप्रेमी’ ती फॉलोही करतात. यातूनच पुढे सोशल नेटवर्किंगवर हॅशटॅगही सुरू झाले आणि त्याला जगभरातून लाखो फॉलोअर्स मिळाले आहेत. काहींनी मित्रमंडळींमध्ये नो शेव्हचे आव्हान दिले असून, ते आणखी मित्रांना पास करायचे आहे. या प्रकारातूनच दाढीच्या नवनव्या फॅशन आणि त्यांची नावेही रूढ झाली आहेत. दाढीच्या अस्सल भारतीय प्रकारांनाही देसी लूक, बिअर्ड बाबा अशी खास नावे देत अनेकांनी हे प्रकार फॉलो केले आहेत.(No shave November Trending On Social media)

ट्रेंड फॉलो करत सामाजिक बांधिलकी जपणारी तरुणाई

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या या ट्रेंडने भारतीय तरुणाईला देखील भुरळ घातली. भारतही अनेक पुरुष हा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहे. या ट्रेंड सोबतच त्यांनी काही सामाजिक कामे देखील हाती घेतली आहेत. कोल्हापूरच्या काही तरुणांनी ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहीम सुरू करून त्यातूनवाचणारे पैसे हे कर्करोगग्रस्त व्यक्तींच्या उपचारासाठी दान करण्याचे ठरवले. गेले 3 वर्ष हे तरुण ‘नो शेव्ह नोव्हेंबर’ मोहिमेतून कर्करोग रुग्णांसाठी निधी गोळा करत आहेत.

(No shave November Trending On Social media)