स्टॉकहोम, स्वीडन : इथियोपियाचे पंतप्रधान अबी अहमद (Ethiopian PM Abiy Ahmed) यांना 2019 वर्षाचं शांततेचं नोबेल पारितोषिक जाहीर झालंय. शत्रू देश इरिट्रियासोबत शांतता प्रस्थापित केल्याने अबी अहमद यांना शांततेचे नोबेल जाहीर करण्यात आल्याची माहिती पारितोषिक निवड समितीने दिली. अबी अहमद (Ethiopian PM Abiy Ahmed) यांच्या प्रयत्नाने इरिट्रियासोबतचा सैन्य संघर्ष संपुष्टात आला, जो 1998-2000 च्या सीमायुद्धानंतर सुरु झाला होता.
शांततेच्या नोबेलसाठी एकूण 301 नामांकन दाखल झाले होते, ज्यात विविध 223 व्यक्तींसह 78 संस्थांचाही समावेश होता. या पारितोषिकाविषयी प्रचंड उत्सुकता लागली होती. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गच्याही नावाची चर्चा सुरु होती. अखेर इथियोपियाच्या पंतप्रधानांच्या (Ethiopian PM Abiy Ahmed) नावावर शिक्कामोर्तब झालं.
अबी अहमद यांनी नेमकं काय केलं?
शेजारी देश इरिट्रियासोबतचा सीमा संघर्ष सोडवण्यासाठी घेतलेल्या निर्णायत्मक पुढाकारामुळे अबी अहमद (Ethiopian PM Abiy Ahmed) यांचा सन्मान केला जात असल्याचं पारितोषिक निवड समितीने सांगितलं.
“पूर्व आणि ईशान्य आफ्रिका प्रदेशात शांतता आणि सलोखा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केलेल्या प्रत्येकाचा हा सन्मान आहे. एकाने प्रयत्न करुन शांतता निर्माण होत नाही. पंतप्रधान अबी (Ethiopian PM Abiy Ahmed) यांनी जेव्हा यासाठी पुढाकार घेतला, तेव्हा राष्ट्रपती अफ्वेर्की यांनी औपचारिक पद्धतीने त्या प्रयत्नांना पुढे नेलं. शांतता करारामुळे इथियोपिया आणि इरिट्रिया या दोन्ही देशात सलोखा निर्माण होईल याचा निवड समितीला विश्वास वाटतो,” अशी प्रतिक्रिया निवडकर्त्यांनी दिली.
ऐक्य, सहकार्य आणि परस्पर सहजीवनासाठी पंतप्रधानांनी जे काम केलं, त्याची साक्ष देणारं हे पारितोषिक आहे, अशी प्रतिक्रिया अबी (Ethiopian PM Abiy Ahmed) यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
कोण आहेत अबी अहमद?
आई ख्रिश्चन आणि वडील ओरोमो मुस्लीम असलेल्या कुटुंबात अबी (Ethiopian PM Abiy Ahmed) यांचा जन्म झाला. दक्षिण इथियोपियामध्ये 1976 मध्ये त्यांचा जन्म झाला. शांतता आणि सुरक्षा मुद्द्यावर अबी यांच्याकडे डॉक्टरेट पदवी आहे, जी त्यांनी अद्दीस अबाबा विद्यापीठातून पूर्ण केली. तर परिवर्तनवादी नेतृत्त्व या विषयावर त्यांनी लंडनमधील ग्रीनविच विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं.
डेर्ग शासनाविरोधात त्यांनी सैन्यात जाण्याचा निर्णय घेऊन संघर्षही केला. शिवाय ते लेफ्टनंट कर्नल पदापर्यंत गेले, ज्यात त्यांनी गुप्तचर आणि संवाद सेवेसाठी काम केलं. 1995 मध्ये त्यांनी संयुक्त राष्ट्राचे शांतीदूत म्हणून रवांडामध्ये काम केलं.
1998 ते 2000 या काळात इरिट्रियाविरोधात सुरु असलेल्या सीमायुद्धात त्यांनी हेरगिरी करणाऱ्या पथकाचं नेतृत्त्व केलं. इरिट्रियाच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या ठिकाणांवर हे पथक कार्य करत होतं. यानंतर त्यांनी 2010 मध्ये राजकारणात प्रवेश केला आणि ओरोमो पीपल्स डेमोक्रेटिक ऑर्गनायझेशनचं सदस्यत्व स्वीकारलं. देशाच्या संसदेवरही ते (Ethiopian PM Abiy Ahmed) निवडून गेले.
खासदार म्हणून त्यांच्या कार्यकाळात अबी (Ethiopian PM Abiy Ahmed) यांनी सतत मुस्लीम आणि ख्रिश्चन यांच्यात होणाऱ्या संघर्षावर मत मांडलं. शांततेसाठी धार्मिक मंचची स्थापना करणं हा एकमेव उपाय असल्याचंही त्यांनी सुचवलं होतं. ते सध्या आफ्रिका खंडातील देशांपैकी सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.
यापूर्वीचे नोबेल विजेते (Nobel Peace Prize)
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचाही 2009 मध्ये शांततेच्या नोबेल पारितोषिकाने सन्मान करण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय संबंध आणि लोकांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी असामान्य प्रयत्न केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
इतर नोबेल पारितोषिक विजेत्यांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जिम्मी कार्टर (2002), मलाला युसूफझाई (संयुक्तपणे 2014), युरोपियन युनियन (2012), संयुक्त राष्ट्र आणि सचिव, कोफी अन्नन (2001 संयुक्तपणे) आणि मदर तेरेसा (1979) यांचाही समावेश होतो.
काय आहे नोबेल पारितोषिक?
नोबेल पारितोषिक विजेत्याला तीन गोष्टी मिळतात. विजेत्या प्रत्येकाला जवळपास साडे चार कोटी रुपये रोख रक्कम, 23 कॅरेट सोन्याचं 200 ग्रॅमचं पदक आणि प्रशस्तीपत्र. पदक म्हणून नोबेल पुरस्काराचे जनक अल्फ्रेड नोबेल यांचा फोटो असलेलं सोन्याचं पदक दिलं जातं. पुरस्कार वितरण सोहळा 10 डिसेंबरला स्वीडनची राजधानी स्टॉकहोम आणि ओस्लोमध्ये होईल.
या वर्षीच्या नोबेल पुरस्कारांची घोषणा