नवी दिल्ली: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केलेल्या टिप्पणीनंतर आता काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना भाजप नेत्यांनी ट्रोल करण्यासा सुरुवात केली आहे. राहुल गांधी यांना देशातील बदनामी कमी पडत होती की काय म्हणून आता ते परदेशातही स्वत:ची बदनामी करून घेत असल्याची खोचक टीका भाजप खासदार गिरीराज सिंह (Giriraj Singh) यांनी केली. (BJP MP Giriraj Singh take a dig at congress leader Rahul Gandhi)
राहुल गांधी यांच्या बुद्धिमतेविषयी चर्चा करण्यासारखे आता फारसे काही उरलेले नाही. बराक ओबामा यांच्यासारख्या बड्या नेत्याने सर्वकाही सांगितले आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना आजपर्यंत देशात जो आदर मिळत होता तो आता जागतिक पातळीवरही मिळेल, अशी खोचक टिप्पणीही गिरीराज सिंह यांनी केली.
Nothing more to discuss on Rahul Gandhi’s Intelligence when big figure like Obama has said it all. Rahul Gandhi should know now that the respect he was getting in India has turned global: Giriraj Singh, Union Minister on Barack Obama’s comment on the Congress leader in his memoir https://t.co/oZornFihW8 pic.twitter.com/DwGYkmb2hy
— ANI (@ANI) November 13, 2020
बराक ओबामा यांच्या व्हाईट हाऊसमधील अनुभवांवर आधारित ‘अ प्रॉमिस लँड’ (A Promised Land) हे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले आहे. त्यानंतर ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये या पुस्तकाचे परीक्षण छापून आले होते. या परीक्षणात ओबामा यांच्या पुस्तकातील अनेक रंजक गोष्टींचा उल्लेख आहे. ओबामा यांनी त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात भेट घेतलेल्या जागतिक नेत्यांविषयीचे अनुभव कथन केले आहेत.
Nervous & Unformed!!
बोलो कौन?
— Sambit Patra (@sambitswaraj) November 13, 2020
यामध्ये भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा समावेश आहे. राहुल गांधी हे कसल्या तरी अदृश्य दडपणाखाली असतात. राहुल गांधी म्हणजे असा विद्यार्थी आहेत की, ज्याला शिक्षकांसमोर चांगली कामगिरी करुन दाखवायची असते. पण कुठेतरी त्या विद्यार्थ्याची गुणवत्ता किंवा संबंधित विषयात प्रावीण्य मिळवण्याची पॅशन कमी पडते, असे मत बराक ओबामा यांनी पुस्तकात म्हटले आहे.
संबंधित बातम्या:
राहुल गांधींना काहीतरी करून दाखवायचेय पण त्यांची गुणवत्ता आणि पॅशन अपुरी पडते: बराक ओबामा
(Giriraj Singh) यांनी केली. (BJP MP Giriraj Singh take a dig at congress leader Rahul Gandhi)